LPG Latest Price : घरगुती LPG गॅस टाकीचे नवीन दर 6 जुलै रोजी बदलले होते. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या (LPG Price Increase) आहेत. या महागाईच्या युगातही तुम्ही 750 रुपयांना घरगुती एलपीजी टाकी तुम्ही खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला अशा गॅस टाकीबाबत सांगत आहे, जे तुम्ही कमी पैशात रिफिल (Refill) करू शकता. या टाकीत मात्र फक्त 10 किलो गॅस राहिल. देशातील अनेक शहरांत दहा किलो गॅस टाकी उपलब्ध आहे. मात्र येथील दर वेगवेगळे आहेत.
राजधानी दिल्ली शहरात 750 रुपयांना दहा किलो गॅस टाकी मिळते. तसेच मुंबई 750 रुपये, कोलकाता 765 रुपये, चेन्नई 761 रुपये, लखनऊ 777 रुपये, जयपूर 753 रुपये, पाटणा 817 रुपये, इंदूर 770 रुपये, अहमदाबाद 755 रुपये, पुणे 752 रुपये, गोरखपूर 794 रुपये, भोपाळ 755 रुपये, आग्रा 761 रुपये आणि रांची शहरात 798 रुपयांना गॅस मिळत आहे.
Petrol Price : तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलबाबत घेतला ‘हा’ निर्णय; पहा, काय आहेत नवीन भाव.. https://t.co/ZqVjQwxzFM
— Krushirang (@krushirang) July 8, 2022
जवळपास 6 दशकांनंतर गॅस कंपन्या (Gas Companies) घरगुती सिलिंडरमध्ये बदल करणार आहेत. बाजारात येणारा कंपोझिट सिलिंडर लोखंडी सिलिंडरपेक्षा 7 किलो हलका असतो. यात तीन थर असतील. आता वापरलेला रिकामा सिलिंडर 17 किलोचा आहे आणि गॅस भरल्यावर तो 31 किलोपेक्षा थोडा जास्त पडतो. आता 10 किलोच्या कंपोझिट सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस असेल.
LPG Price Update : ‘ही’ तर आपल्या मोदी सरकारचीच कृपा.. आठ वर्षात गॅसच्या किंमती ‘इतक्या’ वाढल्या; जाणून घ्या.. https://t.co/jJIg0P8CLE
— Krushirang (@krushirang) July 7, 2022
सध्या देशभरात गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 14.2 किलोच्या घरगुती गॅस टाकीसाठी 1053 रुपये द्यावे लागत आहेत. गॅसच्या किंमती एक हजारांच्या पुढे गेल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आता सरकारने सबसिडी (Subsidy On LPG) देणेही बंद केले आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.