LPG Cylinder : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरच्या दरात घसरण; जाणून घ्या नवीन दर

LPG Cylinder : आता सर्वसामान्यांना एक दिलासा देणारी बातमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाणून घ्या.

आजपासून म्हणजेच 1 जुलै 2024 रोजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आता 19 किलोचा एलपीजी व्यावसायिक सिलिंडर सुमारे 30 रुपयांनी स्वस्त झाला असून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर प्रति युनिट 30 रुपयांनी कमी केले आहेत. जाणून घेऊया एलपीजी सिलिंडरची किंमत.

एलपीजी सिलिंडरची किंमत

  • 14 किलो एलपीजी सिलिंडरबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीत घरगुती सिलिंडरचा दर 803 रुपये तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपये आहे.
  • मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत 802.50 रुपये तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आहे.
  • कोलकातामध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 829 रुपये तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 31 रुपयांनी कमी होऊन 1756 रुपयांवर आली आहे. चेन्नईत घरगुती सिलिंडरची किंमत 818.50 रुपये तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1840.50 रुपयांऐवजी 1809.50 रुपये आहे.

दर महिन्याच्या सुरुवातीला बदलतात किमती

तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीपूर्वी व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या किमती सुधारित करत असून नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेपासून लागू करण्यात येतो. जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले आहेत. पण घरगुती सिलिंडरचे दर कमी झाले नाहीत.

सिलिंडरचे दर बदलण्याची कारणे

  • मागणी-पुरवठा गतिशीलता
  • कर धोरणात बदल
  • आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत बदल होणे

हे लक्षात घ्या की वर नमूद केलेल्या कारणांव्यतिरिक्त, इतर अनेक कारणांमुळे सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार किंवा इतर कोणताही बदल होतो. विविध राज्ये आणि शहरांनी लादलेले विविध कर हे यातील एक मुख्य कारण आहे.

Leave a Comment