Low Price AC : स्वस्तात नवीन एसी खरेदी करायचाय? या ठिकाणी मिळेल 50% पर्यंत सवलत

Low Price AC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. सगळेजण उकाड्याने हैराण झाले आहेत. या काळात अनेकजण एसी खरेदी करत आहेत. मागणी जास्त असल्याने सध्या एसीची किंमत खूप वाढली आहे. पण तुम्ही निम्म्या किमतीत एसी खरेदी करू शकता.

LG 1.5 टन 3 स्टार स्प्लिट एसी

तुम्ही आता LG चे AI Convertible 6-in-1 Cooling 2024 मॉडेल 52% सवलतीने खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की 1.5 टन आणि 3 स्टार स्प्लिट ड्युअल इन्व्हर्टर एसी फ्लिपकार्टवर 78,990 रुपयांऐवजी 37,490 रुपयांना विकत घेता येत आहे. AC देखील Flipkart वर बँक आणि एक्सचेंज ऑफरसह सूचीबद्ध असून अशा वेळी तुमच्यासाठी एसीची किंमत आणखी कमी होईल.

व्होल्टास 1.5 टन 3 स्टार स्प्लिट एसी

सध्या फ्लिपकार्टवर विक्री सुरू असून अशा वेळी तुम्ही एसी स्वस्तात खरेदी करू शकता. या ठिकाणी व्होल्टास 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC 50% सवलतीसह उपलब्ध आहे. किमतीचा विचार केला तर या एसीची किंमत 64,990 रुपये इतकी आहे पण तो निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. हा एसी 31,900 रुपयांना विकला जात आहे.

MarQ 1.5 टन स्प्लिट AC

Flipkart द्वारे तुम्ही आता MarQ 2024 1.5 टन स्प्लिट इन्व्हर्टर हा AC 44% सवलतीत खरेदी करू शकता. तुम्हाला आता हा 4-इन-1 कन्व्हर्टेबल टर्बो कूल टेक्नॉलॉजी एसी 50,999 रुपयांऐवजी केवळ 28,490 रुपयांना खरेदी करता येईल.

सॅमसंग 1.5 टन स्प्लिट एसी

सॅमसंगचे कन्व्हर्टेबल 5-इन-1 कूलिंग 2024 मॉडेल तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. Flipkart द्वारे, तुम्ही 42% सवलतीसह Samsung 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी खरेदी करता येईल. या ठिकाणी एसी 60,990 रुपयांऐवजी 34,990 रुपयांना विकला जात आहे.

पॅनासोनिक 1.5 टन स्प्लिट एसी

तुम्हाला आता ट्रू एआय मोडसह पॅनासोनिकचा 7 इन 1 कन्व्हर्टेबल एसी 33% सवलतीसह खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर या कंपनीचा 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी 55,400 रुपयांऐवजी 36,990 रुपयांना सहज घरी नेता येईल.

Leave a Comment