Lonavala Bhushi Dam : भुशी डॅममध्ये त्या दिवशी नेमकं घडलं काय? बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितले A टू Z

Lonavala Bhushi Dam : राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. अनेकजण आपल्या मित्रपरिवारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. पण अनेकजण फिरायला गेल्यावर काळजी न घेतल्याने मोठे अनर्थ होत आहेत. नुकतीच एक अशी घटना घडली आहे.

भुशी डॅम परिसरात फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तब्बल पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बचावकार्य करणाऱ्यांना वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत तर अजूनही एकजण बेपत्ताच असल्याची माहिती आहे.

बचावकार्य करणाऱ्यांनी भुशी डॅममध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, “पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलेले होतं.

समारंभ आटोपून ते भुशी डॅमजवळ असणाऱ्या धबधब्यावर आले. या ठिकाणी ते साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास आले होते. यावेळी या ठिकाणी अचानक जोरात पाऊस पडू लागला. जरी या ठिकाणी 15 मिनिटांसाठी पाऊस पडला तरी धबधब्याचं पाणी खूप वाढतं. असाच या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नसल्याने दुर्घटना घडली. पुढे जाऊन हा धबधबा भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले असून इतरांचा शोध अजूनही सुरू आहे.”

पुढे ते म्हणाले की, “आम्हाला या दुर्घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित आमची टीम घेऊन घटनास्थळी पोहोचलो. त्यानंतर आम्हाला भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये तीन मृतदेह सापडले. रात्री साडेसात वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होतं. पण अंधार पडल्यामुळे आम्हाला सर्च ऑपरेशन थांबवावं लागलं”, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment