Loksabha Elections 2024 : राज्याचे राजकारण बदलणार, महाविकास आघाडीने दिला महायुतीला मोठा धक्का!

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीने सर्वात मोठा धक्का दिला आहे. 12 वाजेपर्यंत एनडीए 289 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी 237 जागांवर आघाडीवर आहे.

देशातील दिग्ग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार? जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कसभा निवडणूक 2024 चे निकाल आज जाहीर केले जाणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग तिसऱ्या वेळी सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आणि इतर अनेक गैर-भाजप पक्षांचा समावेश असलेली राजकीय इंडिया आघाडी त्यांना आव्हान देत आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आतापर्यंत महाविकास आघाडी 31 जागांवर आणि महायुती 16 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना 12 जागांवर, काँग्रेस 11 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर आहे.

तसेच राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये उभी फूट पडली. यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह तर अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिले. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मात्र सुरूवातीच्या कलांमध्ये बाजी मारली आहे.

Leave a Comment