Loksabha Election Result : दिग्ग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला! निकाल कधी अन् कसा पाहायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

Loksabha Election Result : देशाच्या राजकारणासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस असणार आहे. आज 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. देशातील दिग्ग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार? जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग तिसऱ्या वेळी सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आणि इतर अनेक गैर-भाजप पक्षांचा समावेश असलेली राजकीय इंडिया आघाडी त्यांना आव्हान देत आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

निवडणूक आयोगाकडून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. तुम्ही निवडणूक निकाल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाइट eci.gov.in ला भेट देऊ शकता. वेबसाइटवर जाऊन, तुम्हाला वर दिसलेल्या जनरल इलेक्शन 2024 वर क्लिक करावे लागणार आहे, हे लक्षात ठेवा.

इतकेच नाही तर निवडणूक आयोगाशी संबंधित मतदार हेल्पलाइन ॲप आयओएस आणि अँड्रॉइड मोबाइल ॲपवर डाउनलोड करून सहज निकाल पाहता येईल. तसेच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर अनेक मीडिया चॅनेलद्वारे दिलेले क्षणोक्षणी अपडेट्स पाहता येतील.

अनेक न्यूज चॅनेल्स निकालाशी संबंधित बातम्याही सांगत राहतील. हे लक्षात ठेवा स्मार्टफोन वापरकर्ते थेट YouTube वर जाऊन त्यांचे आवडते चॅनेल शोधू शकतात आणि निकालांचे प्रत्येक अपडेट मिळतील. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्ही किंवा टेलिव्हिजनवर घरी बसून निकाल पाहू शकता.

Leave a Comment