Loksabha Election 2024: ‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा; जाणुन घ्या संभाव्य तारीख

Loksabha Election 2024: देशात आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकते.

सध्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोग अनेक राज्याच्या दौऱ्यावर आहे. सर्व राज्यांतील तयारीचे मूल्यांकन केल्यानंतरच आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा 14-15 मार्च रोजी जाहीर करू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर यावेळीही सात टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होऊ शकते.

आयोगाचे अधिकारी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यानंतर ते उत्तर प्रदेश आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. अधिकारी 13 मार्चपर्यंत आपला दौरा पूर्ण करेल. याच बरोबर राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आयोग बैठकाही घेणार असल्याची माहिती आहे.

राजकीय पक्षही आपापल्या तयारीत  

दरम्यान, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. यामुळेच अनेक राजकीय पक्षांनी तारखा जाहीर होण्यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपने देखील आतापर्यंत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195  उमेदवार जाहीर केले आहेत. तर इतर राजकीय पक्ष देखील उमेदवारांची यादी जाहीर करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या दौऱ्यावर

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान 10 दिवसांत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट देणार आहेत. या काळात ते 29 कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या काळात पंतप्रधान मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू-काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीला भेट देतील.

हवामान पुन्हा बदलणार! ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस- बर्फवृष्टी; अलर्ट जारी

5 मार्च ते 13 मार्चपर्यंत पंतप्रधान मोदी सतत दौऱ्यावर असतील. यादरम्यान ते अनेक प्रकल्प लॉन्च करणार आहेत. जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांचा दौरा संपल्यानंतर निवडणूक आयोग कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment