Loksabha Election 2024 : देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकी पाहता राजकीय पक्षात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाले आहे.

2024 मध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला धक्का देत नवीन आघाडी स्थापन केले.

17 मार्च रोजी कोलकाता येथे दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट झाली. ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांचीही भेट घेणार आहेत.

दोन्ही नेत्यांच्या भेटीची माहिती देताना समाजवादी पक्षाने ट्विट केले की, अखिलेश यादव यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी शिष्टाचाराची भेट घेतली. बैठकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेस 2024 च्या निवडणुकीसाठी आपली भूमिका ठरवत आहे. सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. केसीआर, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि एमके स्टॅलिन हे सर्वजण युतीसाठी प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न यशस्वी होईल अशी आशा आहे. उद्याच्या बैठकीतही या विषयावर चर्चा होणार आहे.

“भाजपला राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा बनवायचा आहे”
TMC खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की, राहुल गांधी यांनी परदेशात गेल्यानंतर ही टिप्पणी केली असून जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत भाजप संसदेचे कामकाज चालू देणार नाही. भाजपला विरोधकांचा चेहरा म्हणून राहुल गांधी हवे आहेत जे भाजपला मदत करतील. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर निर्णय घेण्याची गरज नाही.

“भाजपशी स्पर्धा करण्याची प्रादेशिक पक्षांची क्षमता”
ते म्हणाले की, 23 मार्च रोजी सीएम ममता बॅनर्जी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत. इतर विरोधी पक्षांसोबत आम्ही भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर राखण्याच्या योजनेबद्दल बोलू. ही तिसरी आघाडी आहे असे आम्ही म्हणत नाही, पण प्रादेशिक पक्षांमध्ये भाजपशी टक्कर देण्याची क्षमता आहे. काँग्रेस हा विरोधकांचा ‘बिग बॉस’ आहे, असे समजणे हा भ्रम आहे.

“देशातील प्रत्येकाला बदल हवा आहे”
यापूर्वी कोलकाता येथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्ता परिषदेत अखिलेश यादव सहभागी झाले होते. कार्यकर्ता परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, देशातील प्रत्येकाला बदल हवा आहे. भारतीय जनता पक्षाने देशाचे जेवढे नुकसान केले तेवढे अन्य कोणत्याही पक्षाने केले नसते. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती करणाऱ्या पक्षांसोबत आम्ही निवडणूक लढवणार आहोत.

Share.

Leave A Reply

Exit mobile version