Loksabha Election 2024 : महायुतीसाठी अमित शहा तयार करणार मास्टर प्लॅन, जागावाटपाचा फॉर्म्युला होणार फिक्स?

Loksabha Election 2024 : राज्यात आगामी लोकसभा निवडणूक पाहता महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपाच्या प्रश्नावरून एकापाठोपाठ एक बैठका घेत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला ठरवला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाबाबत एकमत झालेले नाही.

देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक केली आहे. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत शहा यांनी एक फॉर्मुला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुचवाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपकडे 22 जागांची मागणी केली होती मात्र या बैठकीत त्यांनी 13 जागांची मागणी केली आहे तर अजित पवार यांनी देखील दहा जागांची मागणी केल्याची माहिती आहे.

‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा; जाणुन घ्या संभाव्य तारीख

अमित शहा कोणत्या फॉर्म्युल्यावर तयार आहेत?

बारामती आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. अमित शहा शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादीला 4 जागा देऊ शकतात, असा दावा केला जात आहे.

अजित पवारांना काय हवंय?

अजित पवारांना बारामती आणि गड चिरोलीच्या जागा आपल्याकडे हवे आहेत. अजित पवार बारामती मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना तर धरमराव बारा आत्राम यांना गडचिरोलीतून तिकीट देणार असल्याची चर्चा आहे.

मोठी बातमी, 12वीचा जीवशास्त्राचा पेपर फुटला? सोशल मीडियावर व्हायरल

भाजपला किती जागा लढवायच्या आहेत?

भाजपची निवडणूक जिंकण्याची शक्यता जास्त असल्याने राज्यातील 48 जागांपैकी 32 जागांवर भाजपने निवडणूक लढवावी आणि उर्वरित जागा इतर पक्षांनी लढवाव्यात, अशी अमित शहा यांची इच्छा आहे. अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील इतर पक्षांना जास्त जागा देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा वृत्तांत केला जात आहे.

Leave a Comment