Lok Sabha Elections : शिवसेना विरुद्ध शिवसेना! ‘या’ 5 मतदारसंघात शिंदे अन् ठाकरेंचे शिलेदार आमनेसामने

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सुद्धा महायुतीत (Lok Sabha Elections 2024) जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी धुसफूस वाढली आहे. मात्र असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेने 8 उमेदवारांची पहिली यादी चार दिवसांपूर्वी जाहीर केली. या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामध्ये पाच मतदारसंघ असे आहेत तिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या हे मतदारसंघ कोणते आहेत.

शिर्डी

यंदा शिर्डी मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला (Shirdi Lok Sabha) होता. इच्छुकांची संख्या वाढली होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिर्डीवर दावा केला होता. तर दुसरीकडे या मतदारसंघातील शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात नाराजी वाढली होती. त्यातच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे येथे उमेदवारी कुणाला मिळेल हे महायुतीत कोडे बनले होते. परंतु सगळा विरोध आणि शक्यता डावलून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोखंडे यांच्यावरच विश्वास दाखवला. ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी लढत होणार आहे.

Lok Sabha Election : अखेर, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणाच्या खात्यात कोणती जागा ?

Lok Sabha Elections

मुंबई दक्षिण मध्य

या मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेने राहुल शेवाळे यांना तिकीट दिले आहे. शेवाळे यांनी लढत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांच्या बरोबर होणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. शेवाळे दोन टर्म खासदार आहेत तर अनिल देसाई उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात.

बुलढाणा

महायुतीतील बुलढाणा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश मिळालं. हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाला. त्यानंतर शिंदे गटाने या मतदासंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. जाधव आता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रतापराव जाधव यांच्याविरोधात ठाकरे गटाने नरेंद्र खेडकर यांना तिकीट दिलं आहे.

Baramati Lok Sabha : बारामतीत नणंद-भावजयमध्ये सामना; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी

Lok Sabha Elections

मावळ

पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात शिंदे गटाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेने (Shivsena UBT) संजोग वाघेरे यांना उमेदवारी घोषित केली आहे.

हिंगोली

मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील यांना तिकीट दिलं आहे. या मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. तरी देखील पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नागेश आष्टेकर यांना संधी दिली आहे.

Leave a Comment