Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फाटाफूटीने जर्जर (Lok Sabha Elections) झालेल्या इंडिया आघाडीला पहिली गुडन्यूज (INDIA Alliance) उत्तर प्रदेशातून मिळाली आहे. जागावाटपाच्या तिढ्यावर तोडगा निघाला असून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत (Congress Samajwadi Party Alliance) आघाडी झाली आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपला टक्कर देणार आहेत. या जागावाटपात काँग्रेस नेत्यांची हुशारी कमी आली असे काही जाणकार सांगत आहेत तर काही जण या आघाडीचे क्रेडिट समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना देत आहेत. तर काही जणांच्या तोंडी समाजवादी पार्टीच्या प्रेशर पॉलिटिक्सची चर्चा आहे. या आघाडीत कुणाचा फायदा झाला आणि कुणाला झटका बसला याचे उत्तर आज देता येणे कठीण आहे. मात्र जागावाटपात उदारपणा दाखवून अखिलेश यांनी आपल्याच पायांवर कुऱ्हाड तर मारून घेतली नाही ना, अशीही चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकारणात (UP Politics) दबक्या आवाजात सुरू आहे.
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. यामध्ये अमेठी, रायबरेलीसह 17 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत तर उर्वरित 62 जागा समाजवादी पार्टीच्या खात्यात गेल्या आहेत. 1 जागा मित्र पक्षाला मिळणार आहे.
Lok Sabha Elections : अखिलेश जोमात, काँग्रेस कोमात; आघाडी होऊनही तोटा कुणाचा? जाणून घ्या…
Lok Sabha Elections
समाजवादी पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितले की काँग्रेस रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपुर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, महाराजगंज, प्रयागराज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सितापुर, बाराबंकी आणि देवरिया या मतदारसंघासह 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. आता या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदर्शन कसे राहिले याची माहिती घेऊ
Lok Sabha Elections
या निवडणकीत 80 जागांपैकी काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. तर सपा-बसपा आघाडीला 15 जागा मिळाल्या होत्या. दहा मतदारसंघ तर असे होते की जिथे काँग्रेसला दहा टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली होती. रायबरेली मतदारसंघात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 1 लाख 67 हजार मतांच्या फरकाने भाजपाच्या दिनेश सिंह यांचा पराभव केला होता.
Lok Sabha Elections
अमेठी मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दणदणीत पराभव केला. या निवडणकीत इराणी यांनी 55 हजार 120 मतांच्या फरकाने राहुल गांधी यांचा पराभव केला होता. वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा उमेदवार शालिनी यादव यांचा 5 लाख 17 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. तर काँग्रेस उमेदवार अजय राय यांना दीड लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती.
Rahul Gandhi । बिग ब्रेकींग! राहुल गांधींना हायकोर्टाचा मोठा झटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या
यानंतर कानपूर, फतेहपुर सिक्री, बांसगाव, प्रयागराज, महाराजगंज, झाशी, गाझियाबाद, मथुरा, सितपुर, बाराबंकी आणि देवरीया मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी झाले होते तर सहारनपूर आणि अमरोहा मतदारसंघात बसपा उमेदवार विजयी झाले होते.