Lok Sabha Elections : ठाकरेंना धक्का! ‘या’ माजी आमदारांनी केला जय महाराष्ट्र; ‘शिर्डी’ची गणितं बदलणार

Lok Sabha Elections : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे धामधूम (Lok Sabha Elections) सुरू आहे राजकीय पक्षांनी या निवडणुकीचे जोरदार तयारी सुरू केली आहे जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचे याचा विचार केला जात आहे यातच आता नगर जिल्ह्यातून ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे या घडामोडीमुळे शिर्डी मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे शिर्डी मतदारसंघात अद्याप ठाकरे गटाने उमेदवार निश्चित केलेला नाही. काही दिवसांपूर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झाल्याने कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. आता कांबळे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Electoral Bonds Row : भाजपला ‘या’ 10 जणांनी दिले भरघोस देणगी, नाव जाणून व्हाल थक्क

Lok Sabha Elections

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत. लोखंडे पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध वाढला आहे. लोखंडे यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला संधी द्या अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कुणाकडे जाणार हे सुद्धा अद्याप निश्चित नाही. आता तर मनसेने सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

त्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. जागावाटपात जर हा मतदारसंघ शिंदे गटाकडे आला तर कदाचित भाऊसाहेब कांबळे यांचा विचार होऊ शकतो. याचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. नगर दक्षिणेत भाजपने सुजय विखे यांना (Sujay Vikhe) उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारही लवकरच जाहीर होईल. मात्र शिर्डीत राजकीय पक्षांची चांगलीच अडचण झाली आहे. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दावेदारी सुद्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

Shiv Sena MP : महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, शिवसेना खासदारांची धाकधूक वाढली, 13 खासदारांपैकी कोणाचा पत्ता होणार कट ?

Lok Sabha Elections

सध्या शिर्डी मतदारसंघाचे चित्र स्पष्ट नाही. जागावाटपानंतर बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट होईल. तरी देखील उमेदवारीचा प्रश्न कायम राहिल. कारण प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघ कुणाकडे जातो आणि कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment