Lok Sabha Elections : मुलं अन् जावयाला लोकसभेचं तिकीट; ‘या’ पक्षात एकाच परिवाराची घराणेशाही

Lok Sabha Elections : देशाच्या राजकारणात घारणेशाहीचा मुद्दा खूप चर्चेत आहे. भाजप नेते घराणेशाहीच्या (Lok Sabha Elections) राजकारणावर सातत्याने टीका करत असतात परंतु कर्नाटकातील त्यांचाच मित्र जनता दल धर्मनिरपेक्ष (JDS) हा पक्ष घराणेशाहीचे एक जिवंत उदाहरण ठरला आहे. संपूर्ण पक्ष आता एकाच कुटुंबावर अवलंबून असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकात जेडीएस लोकसभेच्या तीन जागांवर भाजपसोबत युती करत असून तीन पैकी दोन जागावर जीडीएसने देवेगौडा कुटुंबातील सदस्यांनाच संधी दिली आहे. माजी पंतप्रधान आणि जीडीएसचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा (HD Dewe Gowda) यांचे जावई सीएन मंजुनाथ भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर बंगळूरु ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

जीडीएस पक्षात घराणेशाही किती प्रबळ आहे याचा अंदाज या कुटुंबातील नऊ सदस्य राजकारणात आहेत यावरूनच लावता येतो. माजी पंतप्रधान देवेगौडा स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी चन्नापटना येथून आमदार आहेत तर कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कर्नाटकातील रामनगर या मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांचा मुलगा निखिल जीडीएसच्या युवा शाखेचा नेता आहे. निखिलने 2019 मध्ये मंड्या लोकसभा मतदारसंघातून आणि 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु या दोन्ही निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता.

Shirdi Loksabha Election | शिर्डीच्या खासदारांनी गट्टम केलेत 16 कोटी..! उमेदवारी रद्द करण्यासह वसूली करण्याची ED कडे मागणी

Lok Sabha Elections

देवेगौडा यांचा मोठा मुलगा एचडी रेवन्ना हे सुद्धा आमदार आहेत. त्यांची पत्नी भवानी हासन जिल्हा पंचायत सदस्य आहेत तर मुलगा प्रज्वल यांनी मागील लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते. परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता पुन्हा एकदा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. रेवन्ना यांचा दुसरा मुलगा सूरज हा देखील कर्नाटक विधानपरिषदेचा आमदार आहे.

अशाप्रकारे देवेगौडा कुटुंब राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद या चारही सभागृहांचे सदस्य आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात होते तसेच या लोकसभा निवडणुकीतही तीन सदस्य निवडणुकीत आहेत. कर्नाटकातील जुना मैसूरु परिसर हा जेडीएसचा बालेकिल्ला मानला जातो या भागात वोक्कलिग समाजाचा प्रभाव जास्त आहे आणि देवेगौडा याच समाजाचे आहेत.

Shirdi Loksabha Election | शिर्डीचे उमेदवार लोखंडे यांच्यावर गंभीर आरोप; ‘त्या’त झालाय मोठा भ्रष्टाचार..! वाचा पत्रकार परिषदेमधील मुद्दे

Lok Sabha Elections

कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू बंगळूरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने देवेगौडा यांचे जावई मंजुनाथ यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीएस यांची युती आहे. भाजपने जेडीएसला लोकसभेच्या तीन जागा दिल्या आहेत तर भाजप स्वतः 25 जागांवर निवडणूक लढणार आहे.

जेडीएसला मिळालेल्या जागांमध्ये मंड्या, हासन आणि कोलार या मतदारसंघांचा समावेश आहे. एचडी कुमारस्वामी मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर प्रज्वल रेवन्ना हासन लोकसभा मतदारसंघातून आणि महेश बाबू कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावरुन हेच स्पष्ट होत आहे की घराणेशाहीच्या राजकारणावर फक्त टीका केली जाते. प्रत्यक्षात ज्यावेळी निवडणूक येते तेव्हा घराणेशाहीचा तिटकारा करणाऱ्या पक्षांना त्यांची मदत घ्यावीच लागते.

Leave a Comment