Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फाटाफुटीने (Lok Sabha Elections) जर्जर झालेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) महिनाभरातून गुडन्यूज मिळाली आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) समाजवादी पार्टीबरोबर (Samajwadi Party) आघाडी झाली आहे. जागावाटपावरून दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला होता. नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. इतकेच नाही तर अखिलेश यादव यांनी काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणाही केली होती. यामुळे आघाडी होणारच नाही असे सांगितले जात होते. परंतु, आघाडी झाली आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी (Congress Party) संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली.
Lok Sabha Elections
समाजवादी पार्टीच्या दबावाच्या राजकारणात काँग्रेस बॅकफूटवर गेली होती. त्यांच्या मोठ्या नेत्यांनाही तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तर प्रदेशात एकूण 80 जागा आहेत. यातील 17 जागा काँग्रेसला सोडण्यावर सहमती बनली आहे. या निवडणुकीत सपा 62 आणि मित्रपक्षाला एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे.
Rahul Gandhi । मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला लागणार ब्रेक
Lok Sabha Elections
आता अशी चर्चा सुरू झाली आहे की काँग्रेसचे कोणते नेते निवडणूक लढवू शकतात. यामध्ये काही बड्या नेत्यांचं नाव मागे पडले आहे. कारण, जागावाटपात ज्या जागा काँग्रेसने मागितल्या होत्या त्या आता समाजवादी पार्टीकडे गेल्या आहेत. या जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने खूप प्रयत्न केले परंतु,ते शक्य झाले नाही.
Lok Sabha Elections
काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष स्वतः बलिया किंवा घोसी मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. या मतदारसंघात भूमिहार समाजाचा चांगला प्रभाव आहे. काँग्रेसने तसा प्रस्तावही दिला होता. परंतु, हा मतदारसंघ सोडण्यास सपाने स्पष्ट नकार दिला. या व्यतिरिक्त डॉ. निर्मल खत्री, राज बब्बर, राजेश मिश्रा यांसारख्या नेत्यांसाठी काही जागा काँग्रेसने मागितल्या होत्या. मात्र सपाने यातील एकही जागा दिली नाही. काही जाणकारांकडून मात्र काँग्रेसची रणनीती यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे.
Rahul Gandhi । ‘त्या’ वक्तव्यावरून राहुल गांधी पुन्हा अडचणीत? जाणून घ्या नेमकं प्रकरण
Lok Sabha Elections
यानंतर माजी खासदार राजेश मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. पक्षाप्रती समर्पण आणि नेतृत्वावरील निष्ठा जास्त महत्वाची आहे. यावरून जागावाटपात काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याचे दिसून येत आहे. आता प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पुन्हा वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढावे लागण्याची शक्यता आहे. माजी खासदार राज बब्बर यांना फतेहपूर सिक्री किंवा गाझियाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
याआधी जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच समाजवादी पार्टीने तीन याद्या जाहीर केल्या होत्या. आघाडी झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत असा स्पष्ट संदेश पार्टीने याद्वारे दिला होता. त्यामुळे काँग्रेसवरील दबाव वाढला होता. या दबावामुळेच तडजोड करणे काँग्रेसला भाग पडले अशी चर्चा आता सुरू झाली आहे. Lok Sabha Elections