Lok Sabha Elections Andhra Pradesh : भाजपसाठी गुडन्यूज! दक्षिण भारतात मिळणार आणखी एक मित्र

Lok Sabha Elections Andhra Pradesh : लोकसभा निवडणुका अगदी जवळ (Lok Sabha Elections Andhra Pradesh) आलेल्या असताना भाजपसाठी आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. दक्षिण भारतात आणखी एक मित्र भाजपला मिळण्याची शक्यता आहे. याआधी कर्नाटकमध्ये जेडीएसने भाजपशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहेत. त्यानंतर आता आंध्र प्रदेशातही नवीन साथी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) आणि जनसेना पक्षाचे प्रमुख अभिनेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी गुरुवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षांत युती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तेलुगू देसम पार्टी आधी भाजपप्रणित (BJP TDP Alliance) एनडीए आघाडीत होती. परंतु, सन 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करत नायडू यांनी भाजपबरोबरील आघाडी तोडली. त्यावेळी नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. यानंतर देशात भाजपविरोधात आघाडी करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. पण त्यांचा हा प्रयोग फार काळ टिकला नाही.

Lok Sabha Elections Andhra Pradesh

आता नायडू पुन्हा एकदा भाजपाबरोबर मैत्री करण्याच्या प्रयत्नांत गुंतले आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्याही केल्या होत्या. आता अशी माहिती मिळत आहे की दोन्ही पक्ष हातमिळवणी करण्यास तयार आहेत. मात्र, सर्व काही जागावाटपावर ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुका जवळ आल्याने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.

Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीनेही सोडली साथ

याआधी चंद्राबाबू नायडू यांनी फेब्रुवारी महिन्यात अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि टीडीपी यांच्यात लवकरच आघाडी होईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, अद्याप अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही. राज्यात लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागा आहेत. भाजप आठ ते दहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. आघाडी झाली तर भाजप लोकसभेच्या पाच ते सहा जागांवर निवडणूक लढवू शकते. जनसेना तीन जागांवर तर उर्वरित जागांव तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार असतील..

Lok Sabha Elections Andhra Pradesh

भाजप-बीजेडीतही युती ?

भाजप आणि बिजू जनता दल (BJD) या दोन पक्षांतही आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. नेत्यांच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या आहेत. ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलही भाजपबरोबर आघाडी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चर्चा यशस्वी राहिल्या तर लोकसभा निवडणुकीआधी या दोन्ही पक्षांतही आघाडी होऊ शकते.

Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

Leave a Comment