Lok Sabha Elections : आता ‘पुणे’ अन् ‘शिरुर’ सोप्पं नाहीच! वंचितने ‘या’ उमेदवारांना दिलं तिकीट

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वातावरण चांगलेच (Lok Sabha Elections 2024) तापले आहे. महाविकस आघाडीचे जागावाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यात वंचित बहुजन आघाडीने (VBA) स्वतंत्र लढण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. इतकेच नाही तर 25 मतदारसंघात उमेदवार सुद्धा दिले आहेत. आताही पुणे आणि शिरूर या दोन मतदारसंघात दोन तगडे उमेदवार वंचित आघाडीला मिळाले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून फायरब्रँड नेते वसंत मोरे तर (Vasant More) शिरूर लोकसभा मतदारसंघातून पहिलवान मंगलदास बांदल यांना (Mangal Das Bandal) तिकीट दिले आहेत.

वसंत मोरे पुण्यातून मनसेकडून (Pune Lok Sabha) इच्छुक होते. परंतु मनसेने त्यांचा विचार केला नाही. पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. यानंतरही त्यांनी लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला. यानंतर ते काँग्रेसकडून इच्छुक होते. परंतु काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले. त्यामुळे मोरे यांचा हिरमोड झाला.

GeM-Tender Training in Marathi | सरकारी ठेकेदार होण्यासाठी सुवर्णसंधी; पहा कुठे मिळते सोप्या भाषेत प्रशिक्षण

Lok Sabha Elections

पण पुढे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तेव्हापासून वसंत मोरे वंचितकडून लढतील अशी चर्चा होती. यानंतर वंचित आघाडीने थेट मोरे यांची उमेदवारीच जाहीर करून टाकली. आता मोरे यांच्या एंट्रीनंतर पुण्यातील निवडणूक दुहेरी न राहता त्रिशंकू झाली आहे. वसंत मोरे यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. वसंत मोरे पुण्यात त्यांच्या खास स्टाइलसाठी ओळखले जातात. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मोरे कायमच धावून जातात. या कामामुळे त्यांची पुण्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात ते काय कमाल करून दाखवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिरूर मतदारसंघात विद्यमान (Shirur Lok Sabha) खासदार अमोल कोल्हे आणि (Amol Kolhe) माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. पण आता मंगलदास बांदल यांच्या रूपात तिसऱ्या भिडूची एन्ट्री झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा त्रिशंकू लढत होणार आहे. बांदल यांच्या एन्ट्रीने मतदारसंघातील लढत अटीतटीची होणार आहे.

Lok Sabha Elections

Maharashtra Politics : ‘या’ माजी खासदाराच्या हाती ‘घड्याळ’, अजितदादांना शिरुरमध्ये उमेदवार मिळाला?

1 thought on “Lok Sabha Elections : आता ‘पुणे’ अन् ‘शिरुर’ सोप्पं नाहीच! वंचितने ‘या’ उमेदवारांना दिलं तिकीट”

Leave a Comment