Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीनेही सोडली साथ

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना (Lok Sabha Elections 2024) काँग्रेससाठी धक्का देणाऱ्या बातम्या (Congress Party) येऊ लागल्या आहेत. गुजरात, अरुणाचल प्रदेशातील आमदारांनी साथ सोडल्यानंतर आता अशीच बातमी दक्षिण भारतातील केरळ (Kerala) राज्यातून आली आहे. केरळचे माजी के. करुणाकर यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल (Padmaja Venugopal) यांनी आज भाजपात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपात (Bhartiya Janta Party) प्रवेश केला. केरळ राज्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, याआधी गुजरातमधील काँग्रेस आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

Arjun Modhwadia Resign : काँग्रेसला गुजरातमध्ये धक्का! ‘या’ कारणामुळे आमदाराने दिला राजीनामा

Lok Sabha Elections 2024

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल आज भाजपात दाखल झाल्या. मागील काही दिवसांपासून त्या काँग्रेस नेतृत्वाच्या कारभारावर नाराज होत्या. त्यानंतर पद्मजा लवकरच भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात होते. झालेही तसेच. आज त्यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे दुःखी होऊन काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असे पद्मजा यावेळी म्हणाल्या. याआधी माजी संरक्षण मंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनीही भाजपात प्रवेश केला होता.

दरम्यान,भाजपने मागील आठवड्यात 17 राज्यांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना तिरुवनंतपूरम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशि थरूर सातत्याने विजयी होत आले आहेत. तर दुसरीकडे अनिल अँटनी केरळातील पथानामथिट्टा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यानंतर आता भाजपसाठी आणखी एक चांगली घडामोड घडली आहे. पद्मजा वेणुगोपाल पक्षात आल्याने या राज्यात भाजपला आणखी राजकीय ताकद मिळणार आहे.

Lok Sabha Elections 2024

Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

पद्मजा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, मी बिनशर्त भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस नेतृत्वाने मला निवडणूक लढण्यासाठी विचारणा देखील केली नाही. मी फोन केले तरी देखील काँग्रेस नेते त्याकडे दुर्लक्ष करत होते. यानंतर आता भाजपकडून पद्मजा वेणुगोपाल यांनी लोकसभेसाठी तिकीट दिले जाऊ शकते अशी शक्यता आहे. पद्मजा या चलाकुडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असे सांगितले जात आहे.

Leave a Comment