Lok Sabha Elections 2024 : भाजपला झटका ! ‘त्या’ यादीतून वगळलं शिंदे अन् अजितदादांचं नाव

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली (Lok Sabha Elections 2024) आहे. महायुतीने अनेक मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. या उमेदवारांच्या मदतीला स्टार प्रचारकही मैदानात उतरणार आहेत. राजकीय पक्षांनी या स्टार प्रचारकांची यादी तयार करून निवडणूक आयोगाला पाठवली (Election Commission) आहे. मात्र या स्टार प्रचारकांच्या संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी स्टार प्रचारकांची यादी केली होती. या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचा समावेश होता. मात्र आता आणखी एक सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उल्लेख नाही.

असं काय घडलं की भाजपला हा निर्णय घ्यावा लागला याच उत्तरही मिळालं आहे. त्याचं असं झालं की ज्यावेळी भाजपने ही यादी जाहीर केली होती त्यावेळी या यादीवर शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. भाजपने लोकप्रतिनिधित्व अधिनियमचे कलम 77 आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे असे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची निवडणूक आयोगाने तात्काळ (Election Commission) दखल घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्र पाठवल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळली आहेत.

Hatkanangale Lok Sabha Election | हातकणंगलेत मोठा ट्विस्ट! राजू शेट्टींना भिडणार जुना सहकारी

Lok Sabha Elections 2024

महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होईल. या निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी भाजपने काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश होता. परंतु या यादीवर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता.

त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवीन यादी पाठवली आहे. अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना एक पत्रही पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की ही यादी राज्यातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येऊ शकते. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

Maharashtra Lok Sabha | मविआ जोमात, महायुती कोमात! ‘त्या’ 9 मतदारसंघात एकमत होईना

Lok Sabha Elections 2024

दरम्यान, लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षातील असले पाहिजेत असा नियम आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्याच पक्षातील नेत्यांचा समावेश असला पाहिजे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे.

Leave a Comment