Lok Sabha elections । मोठी बातमी! ‘या’ दिवशी पार पडणार लोकसभेच्या निवडणुका

Lok Sabha elections । संपूर्ण देशाचे लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे होते. आज या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत घोषणा केली आहे.

निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकांवर जगाचे लक्ष असून आम्ही निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आयोगाच्या टीमने सर्व राज्यांमध्ये सर्वेक्षण करून सर्व व्यवस्था केली आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना भेटलो आणि त्यांच्याकडून प्रणाली सुधारण्यासाठी अभिप्राय घेतला.”

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 10.5 लाख मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. ५५ लाख ईव्हीएममधून मतदान होईल. देशात सुमारे 97 कोटी मतदार असून त्यापैकी 1.82 कोटी नवीन मतदार यावेळी प्रथमच मतदान करणार आहेत. त्यापैकी ८५ लाख महिला मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी ४९.७ कोटी पुरुष तर ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. तसेच 2 लाख 18 हजार मतदार आहेत ज्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे, तर 82 लाख मतदार 85 वर्षांपेक्षा जास्त आहेत.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2014 रोजी संपत आहे. त्याआधी नवीन सरकार स्थापन करायचे आहे. देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा असून कोणत्याही पक्षाला किंवा युतीला सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागांचे बहुमत गरजेचे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे तर, 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात मतदान झाले आणि 23 मे रोजी निकाल जाहीर झाला होता.

Leave a Comment