Lok Sabha Elections 2024 : अमरावतीत भाजपाचा मोठ्ठा डाव! अडसूळ-कडूंचा विरोध डावलत ‘या’ उमेदवाराला तिकीट

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने काल (Lok Sabha Elections 2024) सातवी यादी जाहीर केली. या यादीमध्ये दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अमरावती मतदारसंघातून अखेर विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा आता या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त भाजपने कर्नाटकातील चित्रदुर्ग मतदारसंघातून गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला.

महाराष्ट्रात अमरावती मतदारसंघात (Amravati Lok Sabha) मोठा तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघातून नवनीत राणा पुन्हा इच्छुक होत्या परंतु त्यांच्या उमेदवारीला शिंदे गट आणि भाजपातील काही नेत्यांनी विरोध केला होता. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी (MLA Bachchu Kadu) देखील जोरदार विरोध केला होता. त्यामुळे मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजप नेतृत्व पुढे होता. परंतु या सगळ्यांचा विरोध बाजूला सारात पक्षाने नवनीत राणा यांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे.

Loksabha Election 2024 : महायुतीसाठी अमित शहा तयार करणार मास्टर प्लॅन, जागावाटपाचा फॉर्म्युला होणार फिक्स?

Lok Sabha Elections 2024

मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. परंतु या निवडणुकीत त्यांना पक्षाने पक्ष चिन्हावर लढण्याची अट घातली होती. त्यामुळे राणा यांच्यासमोरही मोठी अडचण निर्माण झाली होती. भाजपात प्रवेश केल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही याचा अंदाज आल्याने अखेर नवनीत राणा यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. यानंतर आता त्या अधिकृतपणे भाजपाच्या तिकिटावर लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मतदारसंघावर दावा ठोकला होता. वेळप्रसंगी निवडणूक लढण्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती. त्यामुळे महायुतीत धुसफूस निर्माण झाली होती. जागावाटपाचा निर्णय होण्याआधीच भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते नवनीत राणा यांचा प्रचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत सातव्या यादीत महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

Lok Sabha Elections 2024

Lok Sabha Elections 2024 : ओडिशात भाजपला धक्का! ‘या’ पक्षाबरोबर आघाडी होणार नाही; पहा, काय घडलं?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नारायण स्वामी यांनी चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. आता या मतदारसंघातून भाजपने गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने ज्या दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत त्या राखीव जागा आहेत.

याआधी मंगळवारी भाजपने सहावी यादी जाहीर केली होती. या यादीत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मणिपूर सरकारमधील (Manipur) मंत्री बसंत कुमार सिंह यांना मणिपूर सेंट्रल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानमधील दौसा येथून कन्हैयालाल मीना यांना उमेदवारी दिली आहे तर करौली धौलपूर मतदारसंघातून इंदूदेवी जाटव यांना तिकीट देण्यात आले आहे.

भाजपाचे 400 शिलेदार मैदानात, अजून 143 बाकी 

19 एप्रिल ते एक जून दरम्यान होणाऱ्या 543 सदस्यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 400 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच हरियाणा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा भाजपने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हरियाणातून मुख्यमंत्री नायक सिंह सैनी आणि आंध्र प्रदेशमधून एन. ईश्वर राव यांच्यासह उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Leave a Comment