Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे 195 उमेदवार फायनल, पहिली यादी जाहीर; PM मोदींना ‘या’ मतदारसंघातून तिकीट

Lok Sabha Elections 2024 BJP First Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections 2024) भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या पहिल्या (Lok Sabha Elections 2024 BJP First Candidate List) यादीत एकूण 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत 34 मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पंतप्रधान मोदींना वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या नावांचाही पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

कोण कुठून निवडणूक लढवणार?

वाराणसीतून पंतप्रधान मोदी, गुनामधून ज्योतिरादित्य सिंधिया, विदिशामधून शिवराज सिंह चौहान, भोपाळमधून आलोक शर्मा, खजुराहोमधून व्हीडी शर्मा, बिकानेरमधून अर्जुनराम मेघवाल, अलवरमधून भूपेंद्र यादव, जोधपूरमधून गजेंद्र सिंह शेखावत, बाडमेरमधून कैलाश चौधरी, कोटामधून ओम बिर्ला यांना तर अरुणाचल पश्चिममधून किरेन रिजिजू यांना उमेदवारी दिली आहे.

Rajya Sabha Election : मोठा विजय तरीही बहुमत नाही; भाजपाला किती जागा कमी? बाकी पक्षांचं काय?

Lok Sabha Elections 2024

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले की 195 उमेदवारांपैकी 28 महिला उमेदवार आहेत. ते म्हणाले 195 पैकी 47 तरुण उमेदवार 50 वर्षांखालील, 27 अनुसूचित जाती, 18 अनुसूचित जमाती, 57 मागासवर्गीय उमेदवार आहेत.

Lok Sabha Elections 2024

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजपने उमेदवारांच्या नावावर विचारमंथन केले होते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर पक्षशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

Lok Sabha Election 2024 : आघाडी केली आता उमेदवारही जाहीर; वाचा, केजरीवालांचे शिलेदार कोण?

Leave a Comment