Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारला मोठा धक्का लागला आहे. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.
माझ्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.केंद्रीय मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान मोदींना सोपवला आणि मी तुमचा आभारी आहे, असे म्हटले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपने चिराग पासवानची निवड केली आहे आणि त्यांच्या पक्षाला लढण्यासाठी 5 जागा दिल्या आहेत. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपती कुमार पारस म्हणाले की, मी अत्यंत प्रामाणिकपणे एनडीएची सेवा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत, पण आमच्या पक्षावर आणि वैयक्तिकरित्या आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.
अनेकांना लागणार धक्का! राज ठाकरे करणार मोठी घोषणा, भाजपला होणार फायदा?
पशुपती पारस हाजीपूर मतदारसंघातून खासदार होते
पशुपती पारस यांनी 2019 मध्ये हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. तेथून जिंकून ते संसदेत पोहोचले. यानंतर जेव्हा एलजेपीचे संस्थापक आणि भारतीय राजकारणातील हवामानशास्त्रज्ञ रामविलास पासवान यांचे निधन झाले, तेव्हा काका पशुपती पारस आणि पुतणे चिराग पासवान यांच्यात संघर्ष सुरू झाला. पारस यांनी पक्षाच्या खासदारांसह चिरागपासून फारकत घेतली. त्यानंतर भाजपने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.
बंपर डिस्काउंट! मारुती सुझुकीच्या ‘ह्या’ कार्स खरेदीवर होणार 80 हजारांची बचत