Lok Sabha Elections 2024 : दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा धक्का; ‘या’ मतदारसंघाचा इतिहासच खास..

Lok Sabha Elections 2024 : देशातील सर्वाधिक चर्चेत (Lok Sabha Elections 2024) असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमेठी. येथील मतदारांना वाटलं एखाद्याला डोक्यावर घ्यावं किंवा निवडणुकीत (Elections 2024) पराभव करावा, सगळं काही मतदारच ठरवतात. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून (Congress Party) ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात राजकारणातले अनेक चाणक्य हा हा म्हणता आऊट झाले आहेत. संजय गांधी, मेनका गांधी, शरद यादव, संजय सिंह, राय मोहन गांधी, कुमार विश्वास, राहुल गांधी, स्मृती इराणी या सगळ्या दिग्गजांना अमेठीत पराभूत व्हावे लागले आहे.

1967 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाची (Amethi Lok Sabha Constituency) चर्चा त्यावेळी झाली ज्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांना येथे उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात जनता पार्टीचे रवींद्र प्रताप सिंह उभे होते. त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात देशभरात संतापाचे वातावरण होते. या संतापाचा फटका संजय गांधी यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला.

या निवडणुकीत रवींद्र प्रताप सिंह यांना 1 लाख 76 हजार 410 मते मिळाली तर संजय गांधी यांना 1 लाख 566 मते मिळाली. यानंतर मात्र 1980 च्या निवडणुकीत संजय गांधी यांनी 1 लाख 28 हजार 545 मतांच्या फरकाने रवींद्र प्रताप सिंह यांचा पराभव केला. या निवडणुकीत संजय गांधींना एकूण 1 लाख 89 हजार 990 मते मिळाली होती. तर रवींद्र प्रताप सिंह यांना फक्त 58 हजार 445 मते मिळाली.

Lok Sabha Elections 2024

Lok Sabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपावरून पुन्हा वाद? ‘या’ 2 जागांसाठी ठाकरे आणि पवार काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी करणार चर्चा

यानंतर संजय गांधी यांच्या निधनानंतर 1981 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी यांच्या (Rajiv Gandhi) विरोधात शरद यादव मैदानात होते. संजय गांधी यांच्या बद्दलच्या सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधी यांनी मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांना एकूण 2 लाख 58 हजार 884 मते मिळाली तर शरद यादव यांना (Sharad Yadav) फक्त 21 हजार 188 मते मिळाली.

1984 च्या निवडणुकीत मात्र गांधी परिवारातीलच दोन सदस्य राजीव गांधी आणि मेनका गांधी आमनेसामने होते. या संघर्षात अमेठीच्या मतदारांनी पुन्हा एकदा राजीव गांधी यांच्यावरच विश्वास दाखवला. त्यांना 3 लाख 65 हजार 41 इतकी भरघोस मते देत संसदेत पाठवले. मेनका गांधी यांना फक्त 50 हजार 163 मते मिळाली. या निवडणुकीत त्यांचे डीपॉझिट सुद्धा जप्त झाले.

1989 च्या निवडणुकीत राजीव गांधी यांच्यासमोर राजमोहन गांधी आणि बसपा संस्थापक कांशीराम होते. परंतु या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत राजीव गांधी यांना 2 लाख 71 हजार 407 मते मिळाली होती. कांशीराम यांना 25 हजार 400 तर राजमोहन गांधी यांना 69 हजार 269 मते मिळाली होती. 1991 च्या निवडणुकीत राजीव गांधी यांना 1 लाख 87 हजार 138 मते मिळाली तर विरोधी भारतीय जनता पार्टीच्या रवींद्र प्रताप सिंह यांना 75 हजार 53 तर जनता दलाच्या नईम यांना 54 हजार 680 मते मिळाली होती.

Lok Sabha Elections 2024

1991 मधील पोटनिवडणुकीत राजीव गांधी यांचे मित्र कॅप्टन सतीश शर्मा मैदानात उतरले. त्यांना 1 लाख 78 हजार 996 इतकी मते मिळाली तर भाजपच्या मदन मोहन यांना 79 हजार 687 मते मिळाली. 1996 च्या निवडणुकीतही सतीश शर्मा यांनी भाजपच्या राजा मोहन सिंह यांचा पराभव केला.

Shirdi Lok Sabha : ‘शिर्डी’चं तिकीट कुणाला? बदलत्या ‘पॉलिटिक्स’ने इच्छुकांची वाढली धाकधूक..

1998 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. संजय सिंह यांनी कमाल करत काँग्रेसच्या सतीश शर्मा यांचा पराभव केला. 1977 नंतर भाजपला हा दुसरा विजय मिळाला होता. डॉ. संजय सिंह यांना 2 लाख 5 हजार 25 मते मिळाली तर सतीश शर्मा यांना 1 लाख 81 हजार 755 मते मिळाली होती.

1999 मध्ये मात्र काँगेसच्या सोनिया गांधी यांनी संजय सिंह यांचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi) तब्बल 4 लाख 18 हजार 960 इतकी विक्रमी मते मिळाली तर संजय सिंह यांना 1 लाख 18 हजार 948 मते मिळाली होती. यानंतर 2004 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी बसपा उमेदवार चंद्र प्रकाश मिश्र मटीयारी यांचा तर 2009 मध्ये बसपाच्या आशिष शुक्ल यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

Lok Sabha Elections 2024

यानंतर 2014 च्या निवडणुकीतही आप उमेदवार कुमार विश्वास आणि भारतीय जनता पक्षाच्या स्मृती इराणी यांचा (Smriti Irani) पराभव करत राहुल गांधी यांनी मोठा विजय मिळवला. दोन मोठे प्रतिस्पर्धी मैदानात असतानाही अमेठीच्या जनतेने राहुल गांधी पारड्यात (Rahul Gandhi) मतांचं दान भरभरून टाकलं. या निवडणुकीत राहुल गांधींना 4 लाख 8 हजार 651 मते मिळाली. तर स्मृती इराणी यांना 3 लाख 748 आणि कुमार विश्वास यांना 25 हजार 527 मते मिळाली.

या पराभवानंतर कुमार विश्वास पुन्हा अमेठीत परतले नाहीत मात्र स्मृती इराणी यांनी मात्र माघार घेतली नाही. याचा प्रत्यय 2019 च्या निवडणुकीत आला. यावेळी मतदारांनी स्मृती इराणी यांच्या बाजूने कौल दिला. आणि राहुल गांधी यांचा पराभव केला. स्मृती इराणी यांच्या रूपात भाजपला या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय मिळाला.

Leave a Comment