Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सत्तेत असणारी महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईत महायुतीच्या जागावाटपाची घोषणा करणार आहेत.
महायुतीत भाजप 28 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना (शिंदे गट) 14 जागांवर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) पाच जागांवर आणि राष्ट्रीय समाज पक्ष एका जागेवर लढणार आहे. तर मनसेला जागा दिल्यास शिवसेना शिंदे किंवा भाजपला एक जागा कमी होणार.
या जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात
1. नागपूर
2. भंडारा-गोंदिया
3. गडचिरोली-चिमूर
4. चंद्रपूर
5. अकोला
महाविकास आघाडीला मोठा धक्का, ‘या’ 8 जागांवर प्रकाश आंबेडकर देणार उमेदवार
6. अमरावती
7. नांदेड
8. लातूर
9. सोलापूर
10. मधा
11. सांगली
12. सातारा
13. नंदुरबार
14. जळगाव
15. जालना
16. अहमदनगर
17. बीड
18. पुणे
19. धुळे
20. दिंडोरी
21. भिवंडी
22. उत्तर मुंबई
23. उत्तर मध्य मुंबई
24. ईशान्य मुंबई
25. दक्षिण मुंबई
26. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
27. उत्तर मुंबई
28. रावेर
शिवसेनेच्या शिंदेंना कोणत्या जागा मिळाल्या?
1. रामटेक
2. बुलढाणा
3. यवतमाळ-वाशीम
4. हिंगोली
5. कोल्हापूर
6. हातकडी
7. छत्रपती संभाजीनगर
8. मावळ
9 . शिर्डी
10. पालघर
11. कल्याण
12 . ठाणे
13. दक्षिण मध्य मुंबई
14. उत्तर पश्चिम मुंबई
राष्ट्रवादीच्या संभाव्य जागा
1. रायगड
2. बारामती
3. शिरूर
4. नाशिक
5. धाराशिव
तर राष्ट्रीय समाजपक्षाचे महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढवू शकतात.
भाजपने 23 जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई, शिर्डी, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या पाच जागांसाठी उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. राज ठाकरेंची मनसे एनडीएमध्ये सामील झाल्यास दक्षिण मुंबई किंवा शिर्डीतून एक जागा दिली जाऊ शकते.
भाजपच्या सातव्या यादीत नवनीत राणा यांचे नाव
तर दुसरीकडे भाजपने काल लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये भाजपने अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. मात्र यावरून राज्यात एनडीएमध्ये वाद निर्माण झाला आहे. अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे मात्र आता महायुतीत राणा यांना प्रचंड विरोध होतं दिसत आहे. यामुळे आता मीही याच जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे शिंदे शिवसेनेच्या गटातील आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.
अकोला विधानसभा पोटनिवडणूक रद्द, आयोगाला मोठा धक्का; ‘हे’ आहे कारण
यासोबतच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्या नावाचा विरोध केला . हे जाणून घ्या कि, नवनीत राणा अमरावतीच्या खासदार आहेत. नवनीत राणा यांनी 2019 मध्ये अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.