Lok Sabha Election : देशातील सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीत फाटाफूट (INDIA Alliance) वाढली होती. परंतु, या धक्क्यांतून आघाडी आता सावरली आहे. उत्तर प्रदेशात सपाबरोबर तर गुजरात, गोवा, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगड या राज्यांत आपबरोबर काँग्रेसची (Congress Party) आघाडी झाली आहे. या आघाडीमुळे मतांची विभागणी टळून भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिल असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काय होऊ शकते याचा अंदाज मांडला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 चा आकडा पार करणे कठीण जाणार आहे. तर भाजपही 370 जागांचे टार्गेट साध्य करू शकणार नाही. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) यंदाही भाजप दमदार कामगिरी करेल अशी शक्यता असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Lok Sabha Election : ठरलं तर! आता ‘या’ राज्यांत आप-काँग्रेस आघाडी पक्की; जागावाटपही फायनल
Lok Sabha Election
काँग्रेसला जागांचे शतक अशक्यच
या निवडणुकीत काँग्रेस शंभरचा आकडा पार करील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. लोकसभेत काँग्रेसच्या सध्याच्या संख्याबळात काही बदल होईल असे वाटत नाही. जर 50 ते 55 अशी संख्या असली तरी यामुळे देशाच्या राजकारणात फार फरक पडणार नाही. या निवडणुकीत काँग्रेस काही विशेष कामगिरी करील अशी शक्यता दिसत नाही. काँग्रेस 100 जागांचा आकडा पार करील अशी शक्यता मला दिसत नाही असे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले.
Lok Sabha Election
भारतीय जनता पार्टी 370 जागांचे लक्ष्य गाठेल का असा दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. भाजपाने त्यांच्या कार्यकर्त्यांना यंदा 370 जागांचे लक्ष्य दिले आहे. आता या टार्गेटला खरे मानण्याची चूक लोकांनी करू नये. प्रत्येक नेत्याला लक्ष्य निश्चित करण्याचा अधिकार आहे. जर लक्ष्य साध्य झाले तर चांगलेच पण जर यात अपयश आले तर पक्षाने नम्रपणे चूक स्वीकारली पाहिजे. 2014 नंतर आठ ते नऊ अशा निवडणुका झाल्या आहेत ज्यामध्ये भाजपला उद्दीष्ट गाठता आलेले नाही, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.
Lok Sabha Elections : सपाकडून घेतल्या 17 जागा पण, काँग्रेसला ‘यूपी’ ‘टफ’; आघाडीचं गणित बिघडणार ?
भाजपसाठी एकट्याने 370 अशक्य
भाजप एकट्याने 370 जागांचे टार्गेट साध्य करू शकत नाही. पश्चिम बंगाल राज्याचा विचार केला तर मागील निवडणुकीत भाजपाने येथे चमकदार कामगिरी केली होती. राज्यातील 42 पैकी 18 जागा जिंकण्यात यश मिळाले होते. आताच्या निवडणुकीतही भाजप या जागा कायम राखील. त्यांच्या जागा कमी होणार नाहीत असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.
भारत जोडो यात्रेची वेळ अयोग्य
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही त्यांनी (Bharata Jodo Nyay Yatra) भाष्य केले. भारत जोडो न्याय यात्रेसाठी ही वेळ योग्य नाही. कारण लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.