Loksabha Election : अहमदनगरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का! निलेश लंकेनी उधळला विजयाचा गुलाल

Loksabha Election : देशात एकूण सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत एकूण ६४. २ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. राज्यात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. तर यंदा देशात सत्तांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यात असे काही मतदारसंघ आहेत, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यापैकी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा होता. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आमदार निलेश लंके यांना मैदानात उतरवले होते. दरम्यान, या निवडणुकीत निलेश लंके यांचा पराभव होईल, अशी टीका भाजपा आणि अजित पवार गटाने केली होती. पण निकालामुळे आता महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अहमदनगरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात निलेश लंकेनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

जेडीयू आणि टीडीपी बनणार किंगमेकर

2024 चे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरही त्यात बदल झाला नाही तर तिसऱ्यांदा सत्तेची वाट पाहणाऱ्या एनडीएला सर्वात मोठा धक्का बसू शकतो. देशात 296 जागांसह बहुमत तयार होईल असे दिसते, पण इंडिया आघाडी देखील 229 जागांसह फार दूर नाही. अशा स्थितीत भाजपला मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करता येणार नाही, अशीही शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment