Lok Sabha Election : MVA मध्ये जागावाटपाचा नवा फॉर्म्युला, प्रकाश आंबेडकरांना धक्का?

Lok Sabha Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी करत संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने  लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने अचानक जास्त जागांची मागणी केल्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा गणित बिघडला आहे. यामुळे आता महाविकास आघाडी नवीन फॉर्म्युला तयार करत आहे.

सावध राहा, होत आहे UPI फसवणूक; काही मिनिटांत बँक खाते होणार रिकामे

प्रकाश आंबेडकरांमुळे घोषणेला विलंब

वृत्तानुसार, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. नवीन फॉर्म्युलानुसार उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढवणार आहे मात्र, प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीचा नव्या फॉर्म्युलात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र त्यांच्यासाठी 4 जागा सोडण्याचा विचार सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या नव्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 22 जागांवर, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 10 जागांवर निवडणूक लढवू शकते.

उद्धव ठाकरे गटाला 23 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचे वृत्त आहे. संजय राऊत यांनी याबाबत अनेकदा भूमिका मांडली होती. मात्र तिन्ही पक्षांच्या बैठकीत ठाकरे गटाला 22 जागा देण्याचा निर्णय झाला. म्हणजे हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला उद्धव गट बिनशर्त पाठिंबा देणार आहे.

Hero HF Deluxe आता घरी आणता येणार फक्त 13 हजारात! असा घ्या फायदा

VBA ला 4 जागा ?

सोमवारपर्यंत जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीने यापूर्वीच व्हीबीएला 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे. दोन-तीन दिवस व्हीबीएची वाट पाहिल्यानंतर एमव्हीए युती करण्याबाबत मोठी घोषणा करेल.

Leave a Comment