Lok Sabha Election : मोठी बातमी! हिंगोलीत हेमंत पाटलांचं तिकीट कट; यवतमाळमध्येही नवा चेहरा

Lok Sabha Election Maharashtra : हिंगोली मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट आला (Lok Sabha Election Maharashtra) आहे. या मतदारसंघातून हेमंत पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी (Hemant Patil) जाहीर केली होती परंतु, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून तीव्र विरोध झाला. त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघातून (Hingoli Lok Sabha Constituency) हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी बाबुराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याऐवजी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांची उमेदवारी जाहीर होताच स्थानिक भाजप नेत्यांनी प्रचंड विरोध केला. या मतदारसंघातील आमदारदेखील हेमंत पाटील यांच्या विरोधात होते. काहीही करून उमेदवार बदला अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी झाली होती. आता या मतदारसंघात दुसरा कोणता उमेदवार द्यायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता तर दुसरीकडे उमेदवार बदलण्यासाठी त्यांच्यावर दबावही वाढत चालला होता.

Lok Sabha Elections : आता ‘पुणे’ अन् ‘शिरुर’ सोप्पं नाहीच! वंचितने ‘या’ उमेदवारांना दिलं तिकीट

Lok Sabha Election

हेमंत पाटील समर्थकांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवा अशी मागणी केली होती. त्यामुळे काय निर्णय घ्यावा असा मोठा प्रश्न शिंदे यांच्यासमोर पडला होता. परंतु आज त्यांनी निर्णय घेत अखेर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी या मतदारसंघातून बाबुराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

हेमंत पाटील यांचे तिकीट कट झाल्यानंतर मतदारसंघात बंडखोरी उफाळून येणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. यवतमाळ-वाशिम या मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना मात्र डावलण्यात आले आहे. मतदारसंघातून उमेदवारी कायम राहावी यासाठी भावना गवळी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत होत्या. त्यांच्या समर्थकांकडूनही गवळी यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतु आज शिंदे गटाने राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर पुढे भावना गवळी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Lok Sabha Election

Loksabha Election 2024 : ‘या’ पक्षाकडून नाना पाटेकर लढणार लोकसभा निवडणूक, गोविंदा, राज बब्बर यांना काँग्रेस देणार संधी?

शिवसेनेच्या काही जागांचा तिढा निर्माण झाल्याने यासंदर्भात बैठका सातत्याने घेतल्या जात होत्या. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी हजर होते. हेमंत पाटील यांचे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु भाजप नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला तर नाशिकच्या जागेवर आधी भाजप आणि नंतर राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे या मतदारसंघातही तिढा निर्माण झाला होता.

मागील दोन वर्षांपूर्वी ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या खासदार भावना गवळी यांच्याकडून उमेदवारासाठी प्रयत्न केले जात होते. या मतदारसंघांबाबत काय निर्णय घ्यावा असा मोठा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांसमोर उभा राहिला होता. हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारावी की कायम ठेवावी हाही मोठा प्रश्न होता. परंतु या तिढ्यावर आज तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे.

Leave a Comment