Lok Sabha Election : काँग्रेस-JMM ला धक्का, भाजपात वाढली इनकमिंग; ‘या’ दिग्गज नेत्यांनी दिला राजीनामा

Lok Sabha Election Jharkhand 2024 : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे देशात सात (Lok Sabha Election Jharkhand 2024) टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत झारखंड राज्यात चार (Jharkhand Politics) टप्प्यात मतदान होणार आहे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. नेमक्या याच वेळी झारखंडच्या राजकारणात मोठीं खळबळ उडाली आहे. निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना काँग्रेसला (Congress Party) मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस ओबीसी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक मारुत नंदन सोनी आणि झारखंड मधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन (Sita Soren) यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सीता सोरेन या झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन (Shibu Soren) यांच्या सून आहेत.

Congress Second List : काँग्रेसची दुसरी यादीही जाहीर; ‘या’ माजी मु्ख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट

Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकीआधी झारखंडच्या (Lok Sabha Election) राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. सीता सोरेन यांनी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर सीता सोरेन म्हणाल्या की राज्यात पाणी, जंगल आणि जमिनीची उपेक्षा होत आहे. राज्यातील नागरिकांना स्थलांतर करण्यास भाग पडत आहे. त्यामुळे आता राज्यात बदल होण्याची गरज आहे.

दरम्यान, याआधी सीता सोरेन यांनी माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना एक पत्र पाठवले होते. यात त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा देणार असल्याचे म्हटले होते. सीता सोरेन या शिबू सोरेन यांचा मुलगा दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीआधी या घडामोडी घडल्याने राज्यात भारतीय जनता पार्टी आधिक मजबूत होत आहे.

Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

भाजप सध्या विरोधात आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यात चांगली कामगिरी करील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहे. पक्षात दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे इनकमिंग वाढले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी काँग्रेस आणि झामुमो आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षातील नेत्यांना पक्ष सोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यादृष्टीने ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.

Leave a Comment