Lok Sabha Election | काँग्रेसला दोन धक्के! एकाची ‘इलेक्शन’ माघार, दुसऱ्याचा भाजप प्रवेश; पहा, काय घडलं?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election 2024) झाले आहे. परंतु देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसला सातत्याने धक्के (Congress Party) बसत आहेत. सूरत, इंदोरनंतर आता ओडिशामध्येही काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. राज्यातील पुरी या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुचारिता मोहंती यांना तिकीट दिले होते. सुचारिता यांनी तिकीट परत करून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने प्रवक्ते डॉ. संबित पात्रा (Sambit Patra) यांना उमेदवारी दिली आहे. आता पात्र यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत.

सुरत आणि इंदोरनंतर ओडिशामध्ये पुरी या मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निधीअभावी या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी मतदानाआधीच मैदान सोडले आहे. त्यांनी काँग्रेसला तिकीट परत केले आहे. याआधी गुजरात मधील सूरत आणि मध्यप्रदेशातील इंदोर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. सूरतमध्ये तर भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले.

Shirdi Loksabha Election | पदाचा गैरवापर करणाऱ्या लोखंडेंची उमेदवारी धोक्यात; त्या’ प्रकरणी शेतकरी संघटना करणार आंदोलन

Lok Sabha Election

सुचारिता मोहंती यांनी यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहून त्यांच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी परत करताना त्यांनी कारणांचा खुलासा देखील या पत्रात केला आहे. मोहंती यांनी म्हटले आहे की निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडून निधी मिळाला नाही. पैशांअभावी प्रचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. पुरी लोकसभा मतदारसंघात येत्या २५ मे रोजी मतदान होणार आहे.

या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने संबित पात्रा यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने सुचरिता मोहंती यांना उमेदवारी दिली होती. परंतु आता मोहंती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. याआधी सूरत आणि इंदोर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे काँग्रेसची मोठी पंचाईत झाली होती. आता तसाच प्रकार पुरी मतदारसंघात घडला आहे.

Congress Candidates List : कंगना अन् मनोज तिवारी; भाजपाच्या फिल्मी स्टार्सविरुद्ध काँग्रेसचे नवे चेहरे

Lok Sabha Election

राजधानी दिल्लीतही काँग्रेसला जबर दणका 

दरम्यान, काँग्रेसला दिल्लीमध्येही आज मोठा धक्का बसला. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली तसेच माजी मंत्री राजकुमार चव्हाण, माजी आमदार नसीब सिंह, माजी आमदार नीरज बसोया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अरविंद सिंग लवली यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. लवली यांनी काँग्रेसने आम आदमी पार्टी बरोबर युती केली त्यामुळे हा निर्णय घेतला होता. लवली याआधीही भाजपमध्ये होते. 2017 मध्ये त्यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु काही महिन्यातच त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये वापसी केली होती.

Leave a Comment