Lok Sabha Election : ठरलं तर! आता ‘या’ राज्यांत आप-काँग्रेस आघाडी पक्की; जागावाटपही फायनल

Lok Sabha Election : INDIA Allianne : लोकसभा निवडणुकांआधी (Lok Sabha Election) फाटाफुटीने जर्जर झालेली इंडिया आघाडी (INDIA Alliance) रुळावर येताना दिसत आहे. जागावाटपात आघाडीला एकामागोमाग एक गुडन्यूज मिळत आहेत. उत्तर प्रदेशनंतर आता दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि चंदीगडमध्ये गुडन्यूज मिळाली आहे. या राज्यांत आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसने एकत्रित निवडणूक (Congress Party) लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु, पंजाबमध्ये अद्याप (Punjab) आघाडीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. पंजाबात आम आदमीची ताकद काँग्रेसपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत आप काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता खूप कमी आहे. या राज्यात परस्पर संमतीने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आम आदमी पार्टीचे खासदार संदीप पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की दोन्ही पक्षांनी पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटप फायनल झाल्यानंतर आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत आघाडी झाल्याची घोषणा केली. या आघाडीमुळे आता भाजपाच्या अडचणी मात्र नक्कीच वाढणार आहेत.

Bengal Seat Sharing । बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! टीएमसीने घेतला मोठा निर्णय

Lok Sabha Election

काँग्रेस नेते मुकूल वासनिक म्हणाले, काँग्रेस हरियाणातील नऊ जागांवर उमेदवार देणार आहे. तर आप कुरुक्षेत्र मतदारसंघात उमेदवार देणार आहे. यासोबतच चंदीगडमध्येही काँग्रेसचे उमेदवार असतील. हरियाणातील लोकसभेच्या दहा जागा सध्या भाजपकडे आहेत. हरियाणासह दिल्ली, गुजरात आणि गोवा या राज्यांत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी झाली आहे. त्यामुळे मतांची विभागणी काही प्रमाणात टळणार आहे.

Lok Sabha Election

वासनिक पुढे म्हणाले, की आप दिल्लीतील चार जागांवर उमेदवार देणार आहे. यामध्ये नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या मतदारसंघांचा समावेश आहे. तर काँग्रेस चांदणी चौक, ईशान्य आणि उत्तर-पश्चिम दिल्ली या तीन जागांवर उमेदवार देईल. गुजरातमध्ये काँग्रेस 24 जागांवर उमेदवार देणार आहे तर भरुच आणि भावनगर या दोन मतदारसंघात आप उमेदवार देणार आहे. गोव्यात काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागांवर उमेदवार देईल.

Indian Cricket : क्रिकेट सोडलं, पॉलिटिक्स सुरू केलं; राजकारणात ‘या’ खेळाडूंचं नशीब चमकलं

उत्तर प्रदेशातही सपा-काँग्रेस आघाडी 

समाजवादी पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितले की काँग्रेस रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपुर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, महाराजगंज, प्रयागराज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सितापुर, बाराबंकी आणि देवरिया या मतदारसंघासह 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. यामध्ये अमेठी, रायबरेलीसह 17 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत तर उर्वरित 62 जागा समाजवादी पार्टीच्या खात्यात गेल्या आहेत. 1 जागा मित्र पक्षाला मिळणार आहे.

Leave a Comment