Lok Sabha Election 2024 : आता भाजपविरोधात लढणार! ‘या’ कारणांमुळे BJP-BJD युती होण्याआधीच ब्रेक

Lok Sabha Election 2024 : ओडीशामध्ये भाजप आणि बिजू जनता दल यांच्यामध्ये आघाडी झाली नाही. आता आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. बीजेडी पुन्हा एकदा त्याच रणनीतीने निवडणुकांना सामोरे जाणार आहे ज्यामध्ये ते राष्ट्रीय मुद्द्यांवर मोदी सरकारचे समर्थन करतील परंतु स्थानिक राजकारणात भाजपबरोबर लढण्याची तयारी देखील करतील. राजकारणातील परिस्थितीनुसार बिजू जनता दल कधी मावळ तर कधी टोकाची भूमिका घेताना दिसत असते.

ओडिशा हे देशातील पाच राज्यांपैकी एक राज्य आहे जेथे लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका (Odisha Assembly Election 2024) होत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एका जागेवरून आठ जागांवर आलेल्या भाजपचा आत्मविश्वास येथे वाढला आहे. यावेळी भाजपने 21 पैकी 16 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दुसरीकडे गेल्या अडीच दशकांपासून सत्तेवर असलेले बीजेडी प्रमुख नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या राजकीय राजवटीला तगडे आव्हान देण्यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ओडिशातील 147 पैकी 23 जागा जिंकून काँग्रेसला मागे टाकत भाजप राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. यावेळी भाजपही राज्यात सत्तेत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पक्ष येथे बहुमत मिळण्याचा दावा देखील करू लागला आहे.

Lok Sabha Election : MVA मध्ये ‘या’ 4 जागांवरून रस्सीखेच, राहुल गांधी करणार चर्चा; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Lok Sabha Election 2024

बीजेडीचा प्रस्ताव भाजपला नामंजूर

भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की बीजेडीने लोकसभेच्या 23 पैकी 11 जागा भाजपला देऊ केल्या होत्या. पण, भाजप स्वबळावर यापेक्षाही अधिक जागा राज्यात जिंकू शकतो असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत होता. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बीजेडीने 147 पैकी भाजपला फक्त 30 ते 35 जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव भाजपच्या नेत्यांना मान्य झाला नाही. युती न होण्यात हे देखील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे यावेळी भाजप आणि बीजेडी एकत्र लढले असते तर ते दोन्ही पक्ष 15 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले असते. याआधी 1998 ते 2009 पर्यंत भाजप आणि बीजेडी एकत्र होते. नवीन पटनायक हे केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये पोलाद आणि खाण मंत्री देखील होते. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-बीजेडी युतीने लोकसभेच्या 21 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत या आघाडीला 19 जागा मिळाल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत युतीने ओडिशातील 21 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या.

Lok Sabha Elections : ठाकरेंना धक्का! ‘या’ माजी आमदारांनी केला जय महाराष्ट्र; ‘शिर्डी’ची गणितं बदलणार

Lok Sabha Election 2024

परिस्थिती पाहून राजकारण

राज्यात राजकीय शत्रुत्व असूनही नवीन पटनायक यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनेक प्रसंगी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. 2009 मध्ये नवीन पटनायक एनडीएपासून वेगळे झाल्यापासून ओडिशात भाजप आणि बीजेडी मध्ये वाद सुरू आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने ओडिशात आक्रमक रणनीती आखत काँग्रेसला विरोधी पक्षाच्या दर्जातून बाहेर काढले.

भाजपाची ताकद वाढली

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर आठ जागा जिंकून राज्यात आपली ताकद दाखवून दिली होती. या निवडणुकीच्या रणधुमाळीत नवीन पटनायक यांनी एका अनुभवी राजकारण्याप्रमाणे केंद्र सरकारशी जवळीक साधली होती. नोटबंदी, काश्मीर मधून 370 कलम हटवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, जीएसटी विधेयक, आणि दिल्ली कायदा विधेयक यांसह अनेक प्रसंगी त्यांनी मोदी सरकारला संसदेत पाठिंबा दिला होता.

या कारणामुळे युती झाली नाही

बीजेडी युतीत भाजपला देण्यास तयार असलेल्या जागांवर भाजप समाधानी नसल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय भाजपसोबत युती करण्याबाबत बीजेडीमध्येही विरोधाभासी वातावरण होते. पक्षाचे नेते मोठ्या संख्येने या संभाव्य युतीच्या विरोधात होते. दुसरीकडे भाजपचे काही बडे नेते बीजेडी त्यांच्यासोबत युती करण्यास इच्छुक असल्याचा प्रचार करत होते. यावर बीजेडीने आक्षेप घेतला होता. या कारणांमुळे राज्यात भाजप आणि बिजू जनता दलात निवडणूकपूर्व युती होऊ शकली नाही.

ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 आणि विधानसभेच्या 147 जागा आहेत सध्या बीजेडीकडे बारा खासदार आणि 112 आमदार आहेत तर भाजपकडे आठ खासदार आणि 23 आमदार आहेत. काँग्रेसकडे एक खासदार आणि नऊ आमदार आहेत.

Leave a Comment