Lok Sabha Election 2024 : भाजपला डबल धक्का! ‘या’ राज्यात युती होण्याआधीच तुटली

Lok Sabha Election 2024 Punjab : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उत्तर भारतात भाजपला (Lok Sabha Election 2024 Punjab) आणखी एक धक्का बसला आहे. आधी ओडिशात बिजु जनता दलाबारोबर (Odisha) युती करता आली नाही त्यानंतर याचीच पुनरावृत्ती पंजाब राज्यात (Punjab Politics) घडली आहे. भाजपाचा जुना सहकारी शिरोमणी अकाली दलाबरोबर पुन्हा युती करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र, यात यश मिळाले नाही. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.

पंजाबातील 13 लोकसभा जागांवर भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी (Sunil Jakhad) एक्स अकाऊंटवर या निर्णयाची माहिती दिली. पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांकडून मिळालेल्या फीडबॅक नंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याआधी ओडिशातील बिजू जनता दल आणि भाजप यांच्यातही युती होऊ शकली नाही. येथेही भाजप स्वबळावरच निवडणूक लढणार आहे.

Lok Sabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपावरून पुन्हा वाद? ‘या’ 2 जागांसाठी ठाकरे आणि पवार काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी करणार चर्चा

Lok Sabha Election 2024

आगामी लोकसभा निवडणुकीत अकाली दल आणि भाजपात पुन्हा युती होईल असे वाटत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांत बैठकाही सुरू होत्या. त्यामुळे युती होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु अकाली दलाने काही अटी भाजपसमोर ठेवल्या ज्यांची पूर्तता करणे भाजपला शक्य नव्हते. यामुळे दोन्ही पक्षांनी युती होण्याआधीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

अकाली दलाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यातही बैठका सुरू होत्या. परंतु यातूनही काही सन्मानजनक तोडगा निघू शकला नाही. आता निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. राज्यात आम आदमी पार्टी सत्तेत आहे. या पक्षाचा खरा सामना आता काँग्रेसबरोबर होणार (Congress Party) आहे. जर शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात युती झाली असती तर निवडणूक अधिक आव्हानात्मक झाली असती.

Shirdi Lok Sabha : ‘शिर्डी’चं तिकीट कुणाला? बदलत्या ‘पॉलिटिक्स’ने इच्छुकांची वाढली धाकधूक..

परंतु आता खरी लढत काँग्रेस आणि आप यांच्यातच होईल. कारण पंजाबात भारतीय जनता पार्टीची ताकद अत्यंत कमी आहे. त्यासाठीच राज्यात भाजपला एखद्या मित्रपक्षाची गरज होती. यासाठी भाजपकडून अकाली दलाशी युती करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ही युती प्रत्यक्षात आली नाही.

Leave a Comment