Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्याचा प्रचार संपला, 25 मे रोजी ‘या’ जागांवर होणार मतदान

Lok Sabha Election 2024 :  गुरुवार 23 मे रोजी संध्याकाळी 6 वाजत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार संपला आहे.

आता लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशातील 58 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये बिहारमधील 8 जागा, हरियाणातील सर्व 10 जागा, जम्मू-काश्मीरमधील एक जागा, झारखंडमधील 4 जागा आणि दिल्लीतील सर्व 7 जागा, ओडिशातील 6 जागा, उत्तर प्रदेशातील 14 आणि पश्चिम बंगालमधील 8 जागांचा समावेश आहे. या 58 लोकसभा मतदारसंघातून 889 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजता संपेल.

उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे त्यात सुलतानपूर, प्रतापगड, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकरनगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज (SC), आझमगड, जौनपूर, मच्छिलशहर (SC) आणि भदोई यांचा समावेश आहे.

या जागांवर होणार मतदान

दिल्ली- चांदनी चौक, उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली.

हरियाणा- अंबाला, कुरुक्षेत्र, सिरसा, हिस्सार, कर्नाल, सोनीपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, गुडगाव, फरीदाबाद.

उत्तर प्रदेश- सुलतानपूर, प्रतापगढ, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकर नगर, श्रावस्ती, डोमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज, आझमगढ, जौनपूर, मच्छिलशहर, भदोही.

पश्चिम बंगाल- तमलूक, कंठी, घाटल, झारग्राम, मेदिनीपूर, पुरुलिया, बांकुरा, बिष्णुपूर.

झारखंड- गिरिडीह, धनबाद, रांची, जमशेदपूर

बिहार- वाल्मिकी नगर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, श्योहर, वैशाली, गोपालगंज (SC), सिवान, महाराजगंज.

जम्मू-काश्मीर- अनंतनाग-राजौरी

ओडिशा- भुवनेश्वर, पुरी, ढेंकनाल, केओंझर (SC), कटक, संबलपूर

Leave a Comment