Lok Sabha Election 2024 : राज्यात पुन्हा कमळ ? ठाकरे – पवारांना धक्का, जाणून घ्या ताजे सर्वेक्षण

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी  राज्यात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच आता एक सर्वेक्षण समोर आला आहे. सर्वेक्षणानुसार राज्यात पुन्हा एकदा भाजप अनेकांना धक्का देत जास्त जागा जिंकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे जाणून घ्या, हे सर्वेक्षण टाइम्स नाऊ ईटीजीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालांबाबत केला आहे. या सर्वेक्षणात राज्यातील सर्व 48 जागांचे संभाव्य निकाल वर्तवण्यात आले आहे. सर्वेक्षणात देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात महायुती महाविकास आघाडी आघाडीपेक्षा खूप पुढे आहे. मात्र असं असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा  फटका बसण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला लोकसभेच्या 48 पैकी 27 ते 31 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. ईटीजी सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपला 27 ते 31 जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला 4 ते 6 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 3 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

मालामाल करणारी योजना! मिळणार दुप्पट पैसे, मग विचार कसला ?

तर विरोधी गटात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 7 ते 9 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 3 जागा आणि काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळू शकतात. तर इतरांना 0 ते 1 जागा मिळू शकतात.

सर्वेक्षणातील आकडेवारी पाहता राज्यात भाजपला फायदा झाल्याचे दिसते. गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच भाजपला 4 ते 8 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सध्या फक्त एकच खासदार आहे. या निवडणुकीत त्यांना 1 ते 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Toyota Fortuner साठी वाईट बातमी! टक्कर देण्यासाठी येत आहे ‘ह्या’ 3 शानदार एसयूव्ही कार्स

महायुतीत एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत. मात्र निवडणुकीत त्यांना केवळ 4 ते 6 जागा मिळू शकतात. म्हणजे शिंदे गटाच्या खासदारांची संख्या थेट निम्म्यावर येणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे शिंदे यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतात. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 7 ते 9 जागा जिंकू शकते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपने 25 जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी 23 जागांवर यश आले. त्यावेळी राज्यात भाजपला सुमारे २८ टक्के, शिवसेनेला २३ टक्के मते मिळाली होती.

Leave a Comment