Lok Sabha Election : नेता असो की कार्यकर्ता? आयोगाच्या ‘या’ 10 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच!

Lok Sabha Election : संपूर्ण देशाचे लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे होते. आज या (Lok Sabha Election) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदा होणार आहे. तर 4 जून रोजी एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे.

देशीत एकूण सात टप्प्यात मतदान (Election Commission) होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, 25 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Lok Sabha Election

या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती राजीव कुमार यांनी दिली. देशभरात मतदानासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदारांना काही अडचणी आल्यास, मतदारांच्या काही तक्रारी असतील तर काय करता येईल या महत्वाच्या गोष्टींचीही माहिती दिली. तसेच नेता असो की कार्यकर्ता निवडणूक आयुक्तांच्या या गोष्टी सगळ्यांनीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान; जाणून घ्या, कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान?

1. राजीव कुमार म्हणाले, द्वेषपूर्ण वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्देश दिले आहेत. निवडणुकीत अशा वक्तव्यांना काहीच स्थान नाही. नेता असो की कार्यकर्ता जर या लोकांनी अशी वक्तव्य केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.

Lok Sabha Election

2. निवडणुकीत जर पैशांचा वापर झाला तर कठोर कारवाई करण्यात येईल. तपास यंत्रणांशी आम्ही संपर्कात आहोत. चोरीछुप्या पद्धतीने जर कुणी निवडणुकीत पैशांचा वापर करताना दिसले तर त्यांना आजिबात सोडणार नाही.

3. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. जर सोशल मीडियावर कुणी बनावट बातम्या, चुकीची माहिती प्रसारित करताना आढळला तर संबंधिताविरोधात कठोर कारवाई होईल.

4. राजकीय पक्षांनीही उमेदवारांना तिकीट देताना काळजी घ्यावी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला जर तिकीट देत असाल तर अशा उमेदवारांनी उमेदवारी का दिली जात आहे याचं कारण संबंधित पक्षाला स्पष्ट करावे लागेल. यासाठी टिव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रात जाहिराती द्याव्या लागतील.

Lok Sabha Election

Lok Sabha Election : 370 पर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची ‘या’ राज्यांवर विशेष नजर; तयार केला मास्टर प्लॅन

5. निवडणूक प्रचाराच्या काळात वैयक्तिक टीका करणे प्रचारकांनी टाळले पाहिजे. जर असे करताना कुणी आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई होईल याची खात्री बाळगा. प्रचार हा मुद्द्यांवरच व्हायला हवा असे आयगाने सांगितले आहे.

6. राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार अभियानात प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करू नये. जर असे करताना कुणी आढळून आले तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल.

7. राजकीय पक्ष जर प्रचार काळात चुकीची जाहिरात देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. निवडणुकीतील सर्व राजकीय पक्षांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी अशा सूचना राजीव कुमार यांनी दिल्या.

8. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की राजकीय पक्षांनी प्रचारकाळात जाती आणि धर्माच्या गोष्टी करू नयेत. निवडणुकीतील प्रचार सर्वांना जोडणारा असावा. सगळ्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी.

AAP Candidates List Lok Sabha Elections 2024 : भाजपचा पराभव करण्यासाठी केजरीवाल तयार? केली ‘ही’ मोठी घोषणा

9. सोशल मीडियावर कोणत्याही नेत्याला किंवा उमेदवाराला बदनाम करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत. जर असे करताना कुणी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल असा इशारा निवडणूक आयुक्तांनी दिला.

10. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या संघटनांना योग्य मार्गदर्शन करावे. सर्वच पक्षांनी त्यांच्या संघटनात्मक कामकाजात पारदर्शकता ठेवावी. या गोष्टींचे राजकीय पक्ष,  नेतमंडळी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पालन करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment