Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले; 17 उमेदवारांची यादी जाहीर, शिर्डीचं तिकीट कुणाला?

Lok Sabha 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Lok Sabha 2024) जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही (Elections 2024) महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही मतदारसंघात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी देखील राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. आज उद्धव ठाकरे गटाने राज्यातील (Uddhav Thackeray) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.

या यादीमध्ये दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील, नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत शिर्डीच्या जागेवर नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी देण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024 : भाजपला डबल धक्का! ‘या’ राज्यात युती होण्याआधीच तुटली

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. मुंबई दक्षिण मध्य येथून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत बुलढाणा-प्रा. नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम संजय देशमुख, मावळ-संजोग वाघेरे, सांगली-चंद्रहार पाटील, हिंगोली-नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगर-चंद्रकांत खैरे, धाराशिव-ओमराजे निंबाळकर, शिर्डी-भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक-राजाभाऊ वाजे, रायगड-अनंत गीते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-विनायक राऊत, मुंबई ईशान्य-संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण-अरविंद सावंत, मुंबई वायव्य-अमोल कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई, परभणी-संजय जाधव आणि ठाणे मतदारसंघातून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे.

Lok Sabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपावरून पुन्हा वाद? ‘या’ 2 जागांसाठी ठाकरे आणि पवार काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी करणार चर्चा

Leave a Comment