Loan for Animal Husbandry । सध्या पशुपालन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील; तर काळजी करू नका. तुम्ही सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता.
पशुपालकांना आता पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. ज्यात 50 टक्के सबसिडीही मिळेल. पशुपालनाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येईल. जेणेकरून डेअरी उद्योगाला गती मिळेल. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वयंरोजगार यामुळे मिळेल.
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम निश्चित करण्यात येते. जनावरांच्या खरेदीसाठी कर्जाची रक्कम 50 हजार ते 12 लाख रुपयांपर्यंत असून दुग्धव्यवसायासाठी कर्जाची रक्कम 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असते. नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना दोन प्रकारात उपलब्ध आहे.
पहिले पशु खरेदी कर्ज, ज्या अंतर्गत जनावरांच्या खरेदीसाठी पैसे देण्यात येते. तर दुसरा दुग्धव्यवसायासाठी उपलब्ध आहे. ज्या अंतर्गत दुग्धव्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे खरेदीसाठी पैसे देण्यात येतात.
व्याजाची किंमत
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत, कर्जाचा व्याज दर वार्षिक ६.५ टक्के ते ९ टक्के असून कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षांपर्यंत आहे. नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमाती अर्जदारांना 33.33 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येते. इतर अर्जदारांना २५ टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
- ओळख पुरावा
- अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
- पशुपालन व्यवसाय नियोजन
- अर्जदाराचे पत्त्याचे प्रमाणपत्र
- अर्ज नाबार्डच्या वेबसाइटवरून किंवा कोणत्याही नाबार्ड प्रायोजित बँकेतून मिळेल.
असा करा अर्ज
तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवावे लागेल. नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी फार्म सुरू करायचा असल्यास त्यासाठी जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जा. समजा तुम्हाला छोटा डेअरी फार्म उघडायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन योजनेबद्दल माहिती घेऊ शकता. सबसिडी फॉर्म भरून बँकेत अर्ज करावा लागणार आहे. इतकेच नाही तर कर्जाची रक्कम मोठी असेल तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही नाबार्ड हेल्पलाइन ०२२-२६५३९८९५/९६/९९ वर संपर्क करू शकता.