Liver Health : ‘या’ पद्धतीने घ्या लिव्हरची काळजी, जीवघेणे आजार राहतील दूर

Liver Health : आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो. आपण आपल्या लिव्हरची काळजी घेतली नाही तर समस्या वाढू शकतात.

यकृत अमीनो ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करत असून यकृत विविध जीवनसत्त्वे, लोह आणि तांबे यांचे योग्य प्रमाण राखून ठेवते. यकृताची काळजी घेणे तसेच ते निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे.

घ्या संतुलित आहार

हिरव्या भाज्या आणि फळे – याद्वारे प्रदान केलेले अँटिऑक्सिडंट्स यकृताला टाकाऊ पदार्थांपासून संरक्षण करतात.

प्रथिने आणि फायबर युक्त अन्न – कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्त आहार यकृताची कार्यशक्ती वाढवत असतात.

साखर आणि चरबीचे सेवन मर्यादित करा – जास्त साखर आणि चरबीयुक्त अन्न खाल्ल्याने फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे असे खाऊ नये.

टाळा दारू आणि धूम्रपान

अल्कोहोल आणि धूम्रपान यकृताचे गंभीर नुकसान करते. जास्त प्रमाणात मद्यपान केले तर लिव्हर सिरोसिस आणि यकृताशी संबंधित इतर आजार होऊ शकतात.

करा नियमित व्यायाम

यकृताच्या आरोग्यासाठी नियमित शारीरिक क्रिया महत्त्वाची असून व्यायाम केला तर वजन नियंत्रणात राहते आणि फॅटी लिव्हरची समस्या कमी होते.
सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करा. यामुळे लठ्ठपणा वाढणार नाही.

पाणी

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि पचन सुधारते.

व्हायरल हेपेटायटीस प्रतिबंध

लसीकरण- हिपॅटायटीस ए आणि बी साठी लसीकरण करावे.

अशी घ्या काळजी – रक्त संक्रमण, टॅटू आणि छेदन करताना स्वच्छतेची काळजी घ्या. कारण स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर संसर्ग होण्याचा धोका असतो.

यकृताच्या काळजीसाठी या सर्व गोष्टींचे पालन करावे. यामुळे यकृत तर निरोगी राहतेच शिवाय अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. हे बदल तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत समावेश करून तुम्ही तुमच्या यकृताचे दीर्घकालीन आरोग्य राखता येते.

Leave a Comment