Liver Failure Symptoms : यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यकृताचे अन्न पचवणे आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे हे मुख्य काम आहे. समजा तुम्ही यकृताची योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या यकृताचे आरोग्य बिघडू शकते.
इतकेच नाही तर काही जणांना यकृताचा आजार अनुवांशिक असतो, तसेच काही जणांना खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे यकृताचा आजार होतो. जर तुमचं यकृत निकामी झालं असेल तर त्यापूर्वी काही लक्षणे दिसू लागतात.
जलद दुखापत होणे
यकृताचा आजार असलेल्यांना लवकर दुखापत होते, इतकेच नाही तर त्यांना जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. कारण यकृत त्या प्रथिनांचे उत्पादन थांबवते.
पोटदुखी आणि सूज येणे
हे लक्षात घ्या की पोटदुखी आणि सूज ही देखील यकृत निकामी होण्याची लक्षणे आहेत. ज्या व्यक्तीचे यकृत निकामी होते त्याला पोटदुखी होते आणि हे पोटदुखी त्याच्यासाठी खूप सामान्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यकृत आजारी पडले तर संपूर्ण शरीरात सूज येते.
थकवा आणि अशक्तपणा येणे
यकृत निकामी होण्याचे एक लक्षण म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा येणे. रक्तात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे घडत असते, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे थकवा राहतो. लिव्हर सिरोसिसमुळे झोपणे तसेच उठणे यात समस्या निर्माण होतात.
त्वचेवर खाज येणे
त्वचेवर खाज येणे हे देखील यकृत निकामी होण्याचे आणखी एक सामान्य लक्षण असून यकृताच्या आजारामध्ये पित्त क्षारांच्या वाढीव पातळीमुळे त्वचेखाली साचते, ज्यामुळे खाज वाढते. सीरम क्षारीय फॉस्फेटच्या उच्च पातळीमुळे खाज सुटत असते.