Liver disease : मधुमेहींनो, या लक्षणांवरून ओळखा तुमचे यकृत खराब होत आहे की नाही? जाणून घ्या सविस्तर

Liver disease : आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. खास करून आपल्या यकृताची काळजी घ्यावी. नाहीतर ते खराब होण्याची शक्यता असते.

आपल्या आहार आणि जीवनशैली शिवाय मधुमेह शरीराच्या अनेक परिस्थितीशी संबंधित असून अनेक संशोधने आणि अभ्यासांनी हे देखील स्पष्ट केले आहे की मधुमेहाचे रुग्ण यकृताशी संबंधित समस्यांमुळे जास्त त्रासलेले असतात, जसे की यकृत खराब होणे, यकृत सिरोसिस आणि यकृताशी संबंधित इतर जोखीम. टाईप 2 मधुमेह असणाऱ्यांना मूक रोगाचा धोका जास्त असतो. यकृत निरोगी ठेवण्यासोबतच आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.

जाणून घ्या यकृत खराब होण्याची लक्षणे

  • पचन बिघडणे
  • पोट आणि यकृत मध्ये तीव्र वेदना
  • यकृताला सूज येणे
  • टाइप 2 मधुमेहाचा धोका
  • थकवा
  • अचानक वजन कमी होणे
  • त्वचा आणि डोळे पिवळसरपणा

फॅटी लिव्हर कसे टाळावे? जाणून घ्या

  • आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या.
  • जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका.
  • वजन वाढू देऊ नका.
  • ठेवा उच्च रक्तदाब नियंत्रणात
  • कोलेस्टेरॉलची पातळीधुम्रपान करू नका.
  • दारूचे सेवन टाळा
  • रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करा.
  • वजन कमी करायचे असेल तर व्यायाम करा.
  • रक्तदाब सामान्य ठेवा.
  • खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरायड्स कायम ठेवा.
  • हिपॅटायटीसची लस घ्या.

यकृताचे नुकसान पूर्ववत होते?

यकृताचे नुकसान लवकर आढळले तर उपचार लवकर केले जाऊ शकतात. कारण यकृत हा एक अवयव आहे जो नवीन ऊतक तयार करून स्वतःची दुरुस्ती करतो. ही स्थिती बर्याच काळापासून कायम राहिली तर सिरोसिसचा धोका असतो, जो त्याच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतो.

Leave a Comment