मुंबई : राज्यातील गड-किल्ले, राष्ट्रपुरुष, तसेच सर्वाच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे व सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी राज्यात ज्या आस्थापनांमध्ये कोणत्याही प्रकारे मद्यविक्री अथवा मद्यपान सेवा दिली जाते, अशा आस्थापनांस सर्व धर्मीयांच्या देवदेवता, धार्मिक श्रद्धास्थाने, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्तींची नावे अशा आस्थापनांना देण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी मद्याची दुकाने, बारला देवदेवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-किल्ल्यांची नावे दिल्याचे दिसते.. राज्यातील गड-किल्ल्यांविषयी, तसेच राष्ट्रपुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात एक वेगळी आस्था असते. त्यामुळे देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ल्यांच्या नावाचा वापर केल्यास देवदेवता, राष्ट्रपुरुष व गड-किल्ल्यांची विटंबना होते. शिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते. त्यामुळे राज्यात यापुढे मद्यविक्री दुकाने, बारला देवदेवता राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, तसेच गड किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. त्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेली नावे बदलण्याकरता 30 जूनपर्यंत मद्यविक्री आस्थापने व बार यांना मुदत दिली आहे.
राज्याच्या गृह विभागानं याबाबत आदेशात काढला आहे. त्यात राज्यातील मद्य विक्री दुकाने व बारना कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांची व गडकिल्यांची नावे देऊ नयेत, याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात गृह विभागाने यादीच जाहीर केली आहे. त्यात 56 राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा, तसेच राज्यातील 105 गड-किल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या मद्यविक्री दुकाने व बारला देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची व गडकिल्ल्यांची नावे असतील, तर ती 30 जूनपर्यंत बदलावीत, अशाही सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेचा ‘रेपो रेट’बाबत मोठा निर्णय, सामान्य कर्जदारांवर काय परिणाम होणार..?
Corona Update : कोरोना येतोय आटोक्यात; मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण..