Lips Care:जर तुम्हीही कोरड्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे ओठ कोमल बनवू शकता. काही वेळा शरीरात पाणी कमी झाल्यामुळे ओठ कोरडे होतात.

Lips Care: हिवाळ्यात कोरड्या ओठांच्या समस्येने (lip problem in winter season) तुम्ही अनेकदा त्रस्त असता. थंड वाऱ्यामुळे ओठ कोरडे होऊन त्याची त्वचा निर्जीव होते. कोरड्या ओठांकडे (dry lip )वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातूनही रक्त (blood )येऊ लागते. चला जाणून घेऊया, या ऋतूत ओठांची काळजी कशी घ्यावी.

https://www.lokmat.com/lifestyle/

  1. एलोवेरा जेल देखील ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी (before slip)तुमच्या ओठांवर कोरफडीचे जेल (alovera jell )लावा. त्यामुळे ओठ कोरडे होणार नाहीत.
  2. क्रीम तुमच्या ओठांना मुलायम बनवण्यासाठी खूप मदत करते. तुमच्या ओठांवर नियमितपणे क्रीम (crème )लावा. कोरड्या ओठांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते.
  3. ग्लिसरीन त्वचेचा कोरडेपणा कमी करते. तुम्ही ओठांवर ग्लिसरी)लावू शकता. हे कोरडे ओठ मऊ करण्यास मदत करते.
  4. बदामाचे तेल त्वचा मुलायम होण्यास मदत करते. तुमच्या कोरड्या ओठांवर नियमितपणे बदामाचे तेल (almod oil)लावा. ओठांवर खोबरेल तेलही (coconut oil)लावू शकता. हे तुमच्या ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. हवे असल्यास या तेलात मध मिसळूनही ओठांवर लावता येते.
  5. आजकाल बाजारात विविध प्रकारचे लिप बाम उपलब्ध आहेत. व्हिटॅमिन ई (vitamin e) असलेले लिप बाम तुम्ही वापरू शकता. त्यामुळे फाटलेल्या ओठांपासून आराम मिळतो.
  6. ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे.
  7. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होण्याची समस्या देखील होते. अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हंगामी फळांचे रस देखील घेऊ शकता.

Disclaimer: लेखात दिलेल्या टिपा आणि युक्त्या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version