Take a fresh look at your lifestyle.

रिलेशनशिप टिप्स : या काही छोट्याशा चुका लग्नानंतर बिघडवतात नाते

अहमदनगर : प्रेम करणं आणि लग्नानंतर ते पूर्ण करणं हे मोठं जबाबदारीचं काम आहे. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जेव्हा लोक लग्न करतात तेव्हा त्यांचे वैवाहिक नाते फार काळ टिकत नाही, असे अनेकवेळा दिसून आले आहे. काही दिवसातच नात्यात अंतर येऊ लागते. त्याचा परिणाम घटस्फोट आणि विभक्त होण्यात होतो. लग्नानंतर किंवा नातं कायम टिकवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊ या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रिलेशनशिपमध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Advertisement

कोणत्याही नात्यात लहानसहान भांडणे सामान्य असतात. पण सर्व वेळ भांडणे आणि मग हे होणारच आहे असा विचार करणे. हे योग्य नाही. कारण प्रत्येक विषयावर मतभेद झाल्यानंतर सतत आपापसात भांडत राहिल्याने जोडीदाराच्या मनात नकारात्मकता येते. मग त्याला हवं असुनही नात्यात गोडवा जाणवत नाही. त्यामुळे शक्य तितके आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

Advertisement

जर तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवायचे असेल तर त्याला तुमच्या भावनांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. कोणत्याही नात्यात भावना व्यक्त करणे आवश्यक असते. कधी कधी चांगल्या भावना व्यक्त न केल्यामुळे नाती तुटतात. कारण समोरच्या जोडीदाराला आपण त्याच्यावर किती प्रेम आणि आदर करतो हे कळत नाही.

Advertisement

जोडीदाराच्या यशाचा, सौंदर्याचा किंवा सामाजिक दर्जाचा हेवा वाटणे हे नाते संपुष्टात येण्याचे लक्षण आहे. कारण एकदा असे विचार तुमच्या मनात आले की तुम्ही इच्छा असूनही तुमच्या जोडीदारासाठी चांगला विचार करू शकणार नाही. म्हणूनच मत्सर, द्वेष, हेवा अशा भावना नात्यात येऊ न देणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

आपण अद्याप जुन्या बॉयफ्रेइण्ड, गिर्ल्फ्रेइंडबद्दल विचार करणे सोडून द्या. नव्या नात्यातच लक्ष केंद्रित करा. जुन्या नात्याबद्दल काळजी करणे किंवा त्याच्याबद्दल बोलणे तुमच्या सध्याच्या जोडीदाराला असुरक्षिततेच्या भावनेने भरून टाकते. नातेसंबंध सुरक्षित ठेवण्याची इच्छा असेल, तर जोडीदाराशी जुन्या नात्याबद्दल बोलू नये.

Advertisement
Advertisement

Leave a Reply