Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. देशात वाढतोय कोरोनाचा कहर.. 24 तासात आढळले इतके कोरोना बाधित

मुंबई : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत 56 टक्क्यांनी वाढ होऊन 58 हजार हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, 534 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 15,389 लोक निरोगी देखील झाले आहेत.

Advertisement

दैनंदिन संसर्ग दर 4.18 टक्क्यांवर गेला आहे. सक्रिय प्रकरणांनी आणखी चिंता वाढवली आहे. प्रत्यक्षात आता देशात 2 लाख 14 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. लसीकरणाचा आकडा 147 कोटींच्या पुढे गेला आहे.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, केरळ, गोवा, पंजाब आणि तेलंगणा या राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. यामुळे कोरोनाचा आकडा 58 हजारांच्या पुढे गेला आहे.

Advertisement

कोरोना बाधित रुग्ण वाढणारी राज्ये अशी : महाराष्ट्र, (18,466), दिल्ली (5,481), बंगाल (9,073), कर्नाटक (2,479), केरळ (3,640) तामिळनाडू (2,731), गुजरात (2,265), राजस्थान (1,137), तेलंगणा (1,052), पंजाब (1,027) , बिहार (893), ओडिशा (680), गोवा (592), आंध्र प्रदेश (334), हिमाचलमध्ये (260).

Advertisement

मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,379 नवीन रुग्ण आढळले आहे. परंतु, बुधवारच्या आकडेवारीनुसार, सुमारे 58 हजार प्रकरणे समोर आली आहेत, जी कालच्या तुलनेत 56 टक्क्यांहून अधिक आहे.

Advertisement

गेल्या वर्षी 28 जानेवारी 2021 रोजीही अशाच प्रकारची वाढ दिसून आली होती आणि प्रजासत्ताक दिनी चाचणीत व्यत्यय आल्याने आदल्या दिवशीच्या मोजणीत मोठी घट झाली होती. मात्र आता प्रजासत्ताक दिन दूर असून अशी प्रकरणे पाहणे चिंताजनक आहे.

Advertisement

ओमिक्रॉनची देशात एकूण 2,135 प्रकरणे आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 2,135 झाली आहे. महाराष्ट्र 653 रुग्णांसह पहिल्या तर दिल्ली 464 रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमिक्रॉनच्या 2,135 रुग्णांपैकी 828 रुग्ण बरेही झाले आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply