Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : ‘पिरियड’मध्ये रक्ताच्या रंगावरून समजतात आजारांचे संकेत..!

मासिक पाळीच्या दरम्यान योनीतून रक्त बाहेर पडते. या रक्ताकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. कारण ते थेट आपल्या आरोग्याबद्दलच संकेत देत असते. जरी हे वेळोवेळी बदलत असले तरी मासिक पाळीच्या वेळी सामान्य पद्धतीने रक्त येत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते. अशा परिस्थितीत आपल्या रक्ताच्या रंगावर लक्ष द्या. रक्ताचा रंग आपल्याला योग्य वेळी योनीतील संसर्ग किंवा कोणत्याही आजाराबद्दल सांगत असते. म्हणून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कधीकधी गर्भाशयाच्या सर्वाइकल कर्करोगामुळे मासिक पाळीच्या दरम्यानही बाहेर येणाऱ्या रक्ताचा रंग बदलतो.

Advertisement

लाल व घट्ट : जर अधूनमधून आपल्या शरीरातून लाल व घट्ट रक्त येत असेल तर हे आपल्यासाठी चांगले लक्षण आहे. रक्ताचा पूर्णपणे लाल रंग सहसा सुरुवातीच्या काळात दिसतो. अशा परिस्थितीत आपण असे गृहीत धरू शकता की आपले आरोग्य आणि पूर्णपणे सामान्य आहे.

Advertisement

नारंगी : जर आपल्याला पीरियड्सदरम्यान नारंगी रंगाचे रक्त येत असेल तर ते चांगले नाही. नारंगी रंगाच्या रक्ताचा अर्थ आहे योनीमार्गात संसर्ग, लैंगिक संक्रमण किंवा इतर कोणत्याही बॅक्टेरियाचा संसर्ग. जेव्हा असे रक्त बाहेर येते तेव्हा आपल्याला एक विचित्र वासखील येऊ शकतो. म्हणून त्याबद्दल निष्काळजीपणा दर्शवू नका.

Advertisement

Krushirang on Twitter: “आज्जी तर ‘सुपर दादी’च; HRCT 20 आणि ऑक्सिजन 75 वर जाऊनही केली करोनावर मात..! @krushirang https://t.co/uMva5IkbLE” / Twitter

Advertisement

करडा : जर या कालवधीत राखाडी रंगाचे रक्त येत असेल तर वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. कारण, असे रक्त म्हणजे योनीमध्ये संसर्ग आहे. याला बैक्टीरियल वेजाइनोसिस इन्फेक्शन असे म्हणतात. जरी हे एक सामान्य संक्रमण असले तरी आपण गर्भधारणेच्या आसपास हा प्रकार आपल्यास दिसून येत असेल तर गर्भपात होण्याचेही हे एक सूचक आहे.

Advertisement

तपकिरी : जर या कालवधीत रक्ताचा रंग तपकिरी दिसत असेल तर घाबरून जाण्याची कोणतीही गोष्ट नाही. या प्रकारचा रक्त प्रवाह सामान्य आहे. लवकर आणि उशीरा पाळी येण्याच्या काळात बहुतेक स्त्रियांसाठी असे दिसते. याचा अर्थ आपल्या शरीरातील रक्त जुने आहे. ते बाहेर येत आहे ही चांगली गोष्ट आहे.

Advertisement

काळा : काळ्या रंगाचा रक्तस्राव हा महिलांचा कालखंड अनियमित असल्यास काळात दिसून येतो. पिरीयडला उशीर झाला तर काळ्या रंगाचे रक्त दिसते. कारण ते सामान्यपेक्षा जास्त ऑक्सिडाइझ होते. यामुळे कोणताही मोठा आजार उद्भवत नाही. परंतु प्रत्येक वेळी असे होत असल्यास त्याबद्दल आपल्या डॉक्टरांना सांगा.

Advertisement

*(ता. क. : ‘कृषीरंग’वर प्रसिद्ध होणारी आरोग्य आणि लाइफस्टाइल याबाबतची माहिती काळजीपूर्वक वाचावी. त्याची अमलबजावणी किंवा वापर करण्याबाबतचा निर्णय घेताना आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा विशेषज्ञ यांच्याकडे मार्गदर्शन घ्यावे.)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Krushirang on Twitter: “धक्कादायक वास्तव : रुग्ण नाही, आरोग्य यंत्रणाच आहे ऑक्सिजनवर; पहा नेमके काय आहे अहवालात @krushirang https://t.co/C2ompg9UKH” / Twitter

Advertisement
Advertisement

Leave a Reply