अहमदनगर : तांदळाचे भजे ऐकायला थोडं वेगळं वाटतय ना.. आपण कांदा भजे, पालक भजे, बटाटा भजे तर नेहमीच ऐकतो. पण, तांदळाचे भजे कदाचित तुम्ही पाहिले नसतील. आज आम्ही तुम्हाला या वेगळ्या पद्धतीच्या तांदळाच्या भज्यांची रेसिपी सांगणार आहे. हे भजे टेस्टी तर आहेतच शिवाय अगदी कमी वेळेत तयार होतात. तुम्हाला जर वेळ कमी असेल तर तुम्ही कमी वेळात तांदळाचे भजे तयार करू शकता. तांदळाचे भजे नाश्त्यात किंवा दिवसभरात कधीही तयार करू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि काही मिनिटांत तयार होते.
साहित्य- शिजलेले तांदूळ 1 कप, बेसन 2 कप, बारीक केलेला कांदा 1, किसलेले अद्रक अर्धा चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या 2, हिंग चिमूटभर, धने पावडर 1/2 चमचा, ओवा 1/2 चमचा, जिरे पावडर 1/2 चमचा, कोथिंबीर – 1/2 कप, तेल, मीठ चवीनुसार.
रेसिपी
तांदळाचे भजे तयार करण्यासाठी प्रथम तांदूळ शिजून घ्या आणि एका भांड्यात ठेवा आणि चांगले मॅश करा. यानंतर मॅश केलेल्या तांदळात बेसन, बारीक केलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, अद्रक टाकून मिसळून घ्या. आता त्यात जिरेपूड, धनेपूड, हिंग, ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिसळून घ्या. यानंतर मिश्रण 10 मिनिटे बाजूला ठेवा.
त्यानंतर मिश्रण घ्या आणि थोडे थोडे पाणी टाकून पातळ करा. लक्षात ठेवा की पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. सामान्य नेहमीप्रमाणेच पीठ तयार करा. द्रावण तयार झाल्यावर एक कढई घेऊन त्यात तेल टाकून गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर भजे बनवून त्यात टाका. थोडा वेळ तळून झाल्यावर भजे उलटे करून दुसऱ्या बाजूने तळून घ्या. भजे सोनेरी तपकिरी आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या. या पद्धतीने सर्व पिठाचे भजे तयार करा. तुमचे टेस्टी तांदळाचे भजे तयार आहेत. चटणीबरोबर सर्व्ह करा.
Recipe : नाश्त्यासाठी तयार करा, टेस्टी कांदा भजे.. रेसिपीही आहे अगदी सोपी..!