पुणे : प्रत्येक व्यक्तीला काही खास सवयी असतात. कोणाला विशेषतः काय आवडते आणि कोणाला नापसंत. जर तुमचा पार्टनर तुमच्या काही सवयींमुळे नाराज असेल तर त्या लगेच बदलण्याची गरज आहे. कारण पुरुष अशा प्रकारच्या सवयीमुळे बायकांवर चिडतात. रागावतात. त्यामुळे अनेकदा नाते तुटण्याच्या मार्गावर येते. चला तर मग जाणून घेऊ या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या महिलांना अडचणीत आणू शकतात.
हुकूमत गाजवण्याची सवय : समाज कितीही आधुनिक झाला तरी चालेल. काही गोष्टी पुरुषांमध्ये जन्मजात असतात. उदाहरणार्थ, पुरुषांना प्रत्येक गोष्टीत स्त्रियांचा शासक स्वभाव म्हणजेच हुकूमत गाजविण्याचा स्वभाव आवडत नाही. किंवा त्यांनी मनमानी केलेली आवडत नाही. जर त्यांना समजले की त्यांची गर्लफ्रेंड किंवा पार्टनर त्यांच्यावर हुकूमत गाजवू पाहत आहे, तर ते लगेच या नात्यापासून दूर जातात. अशावेळी त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष करणे : महिलांनी आपल्या जोडीदाराकडे सतत दुर्लक्ष केल्याने ते नाराज होतात. नात्याच्या सुरुवातेच्या काळात महिला जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळी पुरुष महिलांच्या मागे येतात. नात्याच्या सुरुवातीला महिलांचा हा स्वभाव पुरुषांना आवडतो. पण हळूहळू ही सवय त्यांना त्रास देऊ लागते.
जोडीदाराच्या मैत्रिणींचा हेवा : काही स्त्रियाला जोडीदाराच्या मैत्रिणींचा हेवा वाटतो. ते जोडीदार ओळखत असलेल्या प्रत्येक स्त्रीचा हेवा करतात. तसेच शंका घेतात. या सवयी काही दिवसांनी वेळाने पुरुषांना त्रास देऊ लागतात.
एकमेकांना स्पेस न देणे : नाते चांगले राहावे यासाठी दोघांनीही एकमेकांना स्पेस देणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते की पुरुष महिलांच्या वैयक्तिक बाबींमध्ये खूप लक्ष घालतात. ते बऱ्याच अंशी खरेही आहे. मात्र काही महिलाही अनेक वेळा जोडीदाराच्या वैयक्तिक आयुष्यात आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष देतात. त्यामुळे त्यांचे नाते लवकरच तुटण्याच्या मार्गावर येते.