अहमदनगर : कांदा रवा डोसा हा एक अतिशय लोकप्रिय दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ आहे. डोसा हा दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांमध्ये सर्वाधिक पसंत केला जातो. यात साधा डोसा, मसाला डोसा, पनीर डोसा असे अनेक प्रकार आहेत. डोसा हा असा खाद्य पदार्थ आहे जो प्रत्येक वयोगटातील लोकांना पसंत असतो. डोसाची अशीच एक विविधता म्हणजे कांदा रवा डोसा जो आपल्याकडे जास्त पसंत केला जातो . आज आम्ही तुम्हाला कांदा रवा डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. जर तुम्हाला पण रवा डोसा पसंत असेल तर आणि तुम्हाला ही रेसिपी घरी करून पहायची असेल, तर तुमच्यासाठी ही रेसिपी खूप सोपी ठरेल.
साहित्य – रवा 1 कप, तांदळाचे पीठ 1 कप, बारीक केलेला कांदा 3, भाजलेले काजू 3 चमचे, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या 3, जिरे 1/4 चमचा, हिंग चिमूटभर, बारीक केलेले अद्रक, काळी मिरी अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.
रेसिपी
कांदा रवा डोसा बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घ्या आणि त्यात रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. मिश्रण मऊ होईपर्यंत मिसळत राहा. यानंतर त्यात जिरे, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून मिसळून घ्या. यानंतर, झाकून ठेवा आणि काही तास उबदार ठिकाणी ठेवा. बनवण्यापूर्वी या मिश्रणात चिरलेला कांदा, काजू, अद्रक, हिरवी मिरची, काळी मिरी घालून सर्व चांगले मिसळा. आता त्यात थोडे पाणी घालून डोसा मिश्रणाची पातळ पेस्ट तयार करा.
आता एक नॉनस्टिक तवा घेऊन त्यात एक चमचा तेल टाकून ग्रीस करून गॅसवर ठेवा. तवा गरम झाल्यावर अर्धा कप डोसा मिश्रण मध्यभागी ठेवून वर्तुळाभोवती पातळ पसरवा. यानंतर वर थोडे बारीक केलेले कांदे आणि हिरव्या मिरच्या टाका. यानंतर तीन ते चार मिनिटे भाजून घ्या. या दरम्यान, बाजूने तेल टाका आणि डोसा हलका तपकिरी होऊ द्या. यानंतर, डोसा दुमडून घ्या आणि प्लेटमध्ये काढा. अशा प्रकारे तुमचा स्वादिष्ट कांदा रवा डोसा तयार आहे. हा डोसा सांबार किंवा चटणीबरोबर सर्व्ह करता येतो.
नवीन वर्षात चीजपासून बनवा हा हटके चविष्ट नाश्ता.. मुले होतील खुश