मुंबई : पालक पनीर, बटाटा पालक आणि पालकाची भाजी तुम्ही या सर्वांची कधी ना कधी चव घेतलीच असेल. आज आम्ही पालकासोबत असे कॉम्बिनेशन सांगणार आहोत, ज्याची चवच थोडी वेगळी नाही, तर ते बनवण्यासाठी वेगळेच आहे. होय, ही एक डिश आहे ज्यामध्ये उकळलेल्या चहा पावडरचे पाणी वापरले जाते. पालकात छोले (Palak Chole Recipe) मिसळून बनवलेली ही रेसिपी खास आहे. ही डिश कशी बनवायची ते जाणून घेऊ या..
साहित्य – भिजलेले छोले 2 कप, पालक अर्धा किलो, लसूण 10 पाकळ्या, कांदा 2, टोमॅटो 3, हिरवी मिरची 4, अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा, तेल 3 चमचे, धने पावडर 2 चमचे, काश्मिरी मिरची 1 चमचा, जिरे 1 चमचा, लवंग 3, मोठी वेलची 1, काळी मिरी 4 दाणे, दालचिनी 2 तुकडे, तमालपत्र 1, चहा पावडर 1 चमचा, बटर 1 चमचा, मीठ चवीनुसार.
रेसिपी
रात्रभर भिजलेले चणे घ्या आणि त्यात 1 कप उकळलेले चहाचे पाणी, लवंग, छोटी-मोठी वेलची, तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी आणि लसूण टाका. यानंतर हे मिश्रण कुकरमध्ये टाकून पाच ते सहा शिट्ट्या घ्या. कुकरची वाफ संपली की लसूण सोडून बाकीचे मसाले काढून वेगळे करून घ्या. दुसरीकडे, पालक उकळा आणि बारीक करा. कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात जिरे, अद्रक लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या.
आता त्यात कांदा टाकून मध्यम आचेवर कांद्याचा रंग बदलेपर्यंत परता. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो, धनेपूड, काश्मिरी मिरची, मीठ आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या. थोडा वेळ मंद आचेवर शिजल्यानंतर मसाल्यातून तेल सुटू लागले की त्यात चणे आणि पालक टाका. मंद आचेवर झाकून ठेवा आणि 10 मिनिटे थांबा. आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि उकळी आल्यावर गॅस बंद करा. शेवटी बटर टाकून गरमागरम रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
Todays Recipe : घरच्या घरीच तयार करा टेस्टी पालक खिचडी.. आरोग्यासाठीही आहे फायदेशीर..